अहमदनगर
Pune crime news पन्नास लाख रुपये खंडणीसाठी अपहरण करणारे आरोपी 12 तासात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले ही कारवाई जिल्ह्यातील काष्टी तालुका श्रीगोंदा येथे केली. अपहरण केलेल्या तीन व्यक्तींची पोलिसांनी येथील हॉटेल मधून सुटका केली.
याबाबतचे वृत्त असे कि, मार्केटयार्ड परिसर, पुणे येथून तिघांना पन्नास लाख रुपयांच्या खंडणीसाठी हर्षप्रताप महेंद्रप्रताप सिंग राजपुत व त्याचे इतर दोन साथीदार यांचे अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले होते. हे अपहरण १२ जानेवारी रोजी केले होते, त्यानंतर विवेकसिंग अनिलकुमार सिंग राजपुत वय 23, धंदा बांधकाम व्यवसाय, रा. वसंतविहार, साकीनाका, मुंबई यांनी आपले भाऊ आणि दोघांचे अपहरण केले असल्याची फिर्याद बाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशन जिल्हा पुणे येथे दिली.
पुणे पोलिसांनी या अपहरण कर्त्यांचा माग काढला असता ते दौंड मार्गे अहमदनगर येथे गेल्याचे आढळून आले.
खंडणी विरोधी पथकाने या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत राजश्री हॉटेल,नगर दौंड रोड,काष्टी, ता. श्रीगोंदा येथे हॉटेलच्या रुममध्ये काही इसमांना डाबुन ठेवले असल्याची माहिती मिळाली.
या पथकाने छापा टाकला असता राजश्री हॉटेलचे पाठी मागिल बाजुने पळुन जाणाऱ्या व्यक्तींना पथकाने संशयीत आरोपींचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे
1) विशाल बबनराव मदने वय 32, रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा 2) विजय लक्ष्मण खराडे वय 38, रा. श्रीगोंदा फॅक्टरी, ता. श्रीगोंदा व 3) प्रविण रंगनाथ शिर्के वय 38, रा. बाबुर्डी, ता. श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे मार्केटयार्ड परिसर, जिल्हा पुणे येथील अपहरत इसमांबाबत विचारपुस करता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने तपास करता त्यांनी त्यांचे इतर साथीदारासह मार्केटयार्ड परिसर, पुणे येथुन अपहरण केलेल्या इसमांना राजश्री हॉटेलमध्ये ठेवले आहे अशी कबुली दिल्याने राजश्री हॉटेलमध्ये जावुन खात्री करता राजश्री हॉटेलचे दुस-या मजल्यावरील रुममध्ये काही इसम घाबरलेल्या स्थितीत बसलेले दिसुन आले त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी
1) हर्षप्रताप महेंद्रप्रताप सिंग राजपुत, वय 23, रा. साकीनाका, मुंबई, 2) प्रतिष नवनाथ जगदाळे, वय 34, रा. शरदनगर चिखली, जिल्हापुणे व 3) किसनकुमार रामकुमार गुप्ता, वय 24, रा. साकीनाका, मुंबई असे सांगितले. अपहरत इसम हेच असल्याची पथकाची खात्री झाल्याने आरोपी व अपहरत इसमांना ताब्यात घेवुन खंडणी विरोधी पथक, युनिट-2, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.