Friday, November 8, 2024

pmpml पीएमपीएमएल, पुणेकरांची जीवनवाहिनी !!

पीएमपीएमएल, पुणेकरांची जिवनवाहीनी!!

पर्यावरणपूरक प्रवासाबरोबरच किफायतशीर आणि कानाकोपऱ्यात पोहचणारी पीएमपीएमएलची वाहतूक सेवा

pmpml ही पुणे मेट्रोपॉलिटन रिजन (PMR) क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक करणारी पुणेकरांची लाडकी बससेवा. PMPML ची स्थापना 2007 मध्ये PMC आणि PCMC च्या 60:40 प्रमाणात संयुक्त मालकीची संस्था आहे. सध्या, पीएमपीएमएलच्या ताफ्यात डिझेल आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) बस आणि इलेक्ट्रिक बसेस (ई-बस) अशा एकूण २,१६९ बसेसचा समावेश आहे.

सीएनजी व इलेक्ट्रिक बसेसच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापर भारतातील महानगरातले वायुप्रदुषण कमी करण्यात नक्कीच हातभार लावत आहेत. PMPML च्या ताफ्यात सध्या 650 ई-बस कार्यरत आहेत. कदाचीत ही भारतातली या घडीचा सर्वात मोठा इलेक्ट्रिक बसचा ताफा आहे. महाराष्ट्र सरकारच्या इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) धोरण 2021-2025 पर्यंत सार्वजनिक वाहतूक बसच्या ताफ्याचे 25% विद्युतीकरण- वेळापत्रकाच्या खुपच आधी गाठणे यामूळे पुण्याला सहज शक्य आहे.

पुणे ई बस प्रकल्प हे देशातील इतर सर्व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या संस्थासाठी एक यशस्वी उदाहरण आहे. ठेकेदार निवड प्रक्रियेदरम्यान योग्य काळजी घेतल्याने आधुनिक , वातानूकुलीत , आवाजरहीत, प्रदुषण मुक्त उच्च गुणवत्तेच्या ई बसेस प्रवासी सेवेत आणण्यात आल्या आहेत. यामूळे अत्यंत गजबजलेल्या रहदारीच्या मार्गावर देखील आरामदायी आणि किफायतशीर पर्यावरण पुरक प्रवास करणे पुणेकरांना शक्य होते. जागतिक मानांकन संस्था, जागतिक बँक, UITP आणि विविध STU चे व्यवस्थापकीय संचालक यासारख्या अनेकांनी डेपोंना मागच्या काळात प्रत्यक्ष भेट दिली आणि संस्थेच्या कार्यपध्दतीते कौतुक केले.
पुणे महानगरपालिका (पीएमसी), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी), पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) आणि पीएमपीएमएल यातील अधिकारी आणि राजकीय नेतुत्व याचे खरे शिल्पकार आहेत कारण अशा वाहतुक सेवेची अंमलबजावणी करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. आंतरविभागीय समन्वयामुळे बसेसचे नियोजन उत्तम आणि वेगाने होऊ शकते यासाठी PMC, PCMC, PSCDCL, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) यांनी बिझनेस मॉडेल डिझाइन, टेंडरिंग आणि कॉन्ट्रॅक्टिंग आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगवर यासाठी एक ई-बस वर्किंग ग्रुप तयार केला आहे. नियमित बैठका, प्रत्येकाच्या जबाबदारीचे सुस्पष्ट नियोजन यामूळे वाहतूक व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडला आहे. PMPML ने शहरातील विविध मार्गांवर 950 नवीन बसेस सुरू करण्याचे आपले लक्ष्य ठेवले आहे.
येत्या काळात 1 दशलक्ष नागरिकांमागे 400-600 बस या जागतीक मानांकनानूसार अधिक १५०० बसेसची गरज लागणार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोकसंख्या आणि शहराची रचना लक्षात घेऊन काही मार्गावर ७ मीटर बसेस चालवण्याची पीएमपीएमएलची योजना आहे. सध्या पुणे शहरात १२ मीटर आणि ९ मीटर अशा बसेस अपेक्षित भारमानापेक्षा जास्त प्रवासी घेउन शहरात धावत आहेत. शहरात बाणेर, भेकराईनगर, पुणे स्टेशन, वाघोली आणि निगडी या पाच ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स आहेत. महिनाभरात चर्‍होली येथेही ई-डेपो सुरू होणार आहे. याशिवाय हिंजवडी आणि अप्पर इंदिरानगरचेही नियोजन आहे. PMPML ला PMC/PCMC कडून 7 मीटरच्या 300 इलेक्ट्रिक बसेस भविष्यात मिळण्याची शक्यता असल्याने लास्ट माईल कनेक्टिव्हीटी अतंर्गत मेट्रोला जोडणाऱ्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर या नविन बसेस उपलब्ध करता येतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles