पुणे
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने स्टार व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत, national education policy maharashtra नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय निवासी निवासी कार्यशाळा उत्साहात व यशस्वीपणें संपन्न झाली.
लोणावळा येथील द अँम्बी व्हॅली सिटी येथे दिनांक 28 एप्रिल ते 29 एप्रिल 23 दरम्यान या निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यशाळेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तसेच राज्याच्या मनपाचे आयुक्त,जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक, योजना शिक्षण संचालनालयाचे संचालक, बालभारतीचे संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यासह राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी,मनपा व नगरपरिषदेचे शिक्षण प्रमुख, प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातील अधिकारी वर्ग आदी क्षेत्रीय अधिकारीही या दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी झाले होते.
कोव्हिड कालावधीत राज्यातील मुलांच्या शिक्षणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी सांघिकपणे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने यंदाचे वर्ष गुणवत्ता वृद्धी वर्ष म्हणून घोषित केले आहे. तसेच केंद्र शासनाने निपुण भारत अभियान व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण new education policy प्रभावीपणे राबविणे बाबत वारंवार सूचित केले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रशासकीय व शैक्षणिक बाबींचे नियोजन सनियंत्रण करणे यासाठी या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. त्यामुळे आगामी काळात शैक्षणिक क्षेत्राला नवीन दिशा देऊन आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी प्रतिपादन केले.
श्री. केसरकर पुढे म्हणाले की देशाची पुढची पिढी घडविण्याचे पवित्र काम शिक्षण विभागाचे आहे. त्यामुळे सर्वांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत एकत्र विचारमंथन करावे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण, अंगणवाडी सेविकांना नर्सरीबाबत शिक्षण, शारीरिक शिक्षण, चित्रकला, गायन, नाट्य आदी कलाविषयक शिक्षण, विद्यार्थ्यांचा मानसिक समुपदेशन, नाविन्यपूर्ण उपक्रम, भारतीय संस्कृतीचा अभ्यास, शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, उपाययोजना, education policy नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यासारख्या विविध बाबीवर वैचारिक देवाण घेवाणही या कार्यशाळेत करावी. आपल्या सूचनांचा शासनस्तरावर विचार करुन शिक्षण विभागास पुढची दिशा ठरवली जाईल.
श्री. केसरकर पुढे म्हणाले की शासनस्तरावरुन शैक्षणिक क्षेत्राची प्रगती होण्यासाठी शिक्षण सेवकांच्या वेतनामध्ये वाढ, शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ, शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश असे विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असून त्याची क्षेत्रीयस्तरावरुन प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकारी यांची आहे.
अधिकारी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शैक्षणिक क्षेत्रात सार्वत्रिकीकरण करावे. लोकसहभागातून मिळणाऱ्या निधीचा निधीचा वापर करुन शाळांमध्ये उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात.
विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती असून क्षेत्रीय अधिकारी यांनी ही संपत्ती समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात यावा. शिक्षकाने बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देवून रोजगारक्षम पिढी निर्माण करावी.
प्राथमिक शिक्षण आयुष्याचा पाया असून त्यादृष्टीने पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. प्रत्येक शाळेत ग्रंथालय, क्रीडांगण असावे. शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवावी. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुन शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रस्थानी ठेवावे, असेही श्री. केसरकर म्हणाले.
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल शैक्षणिक धोरणाबाबतचा प्रवास व राज्याची भविष्यवेधी दृष्टी या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी निपुण भारत अभियान संबंधी सामूहिक प्रतिज्ञा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेतील संशोधन विभागाचे उपविभाग प्रमुख डॉ.दत्ता थिटे यांनी केले. उद्घाटन सत्राचा समारोप महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी केला.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रांत परिषदेचे उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे यांनी new education policy 2022 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उहापोह केला. परिषदेच्या उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे यांनी पायाभूत शिक्षणाचा आराखडा या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.राज्य अभ्यासक्रम आराखडा या विषयावर विभाग प्रमुख राजेंद्र वाकडे यांनी मार्गदर्शन केले.
तदनंतर क्वेस्ट या सामाजिक संस्थेचे निलेश निमकर यांच्या प्रारंभिक साक्षरतेचे अध्यापन या विषयावरील सादरीकरणाने कार्यशाळेतील पहिला दिवस संपन्न झाला.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक कैलास पगारे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
NAS अहवाल, PGI Index नुसार महाराष्ट्राचे यश, स्टार,समग्र शिक्षा अंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी, पी. एम. श्री. शाळा , व्यावसायिक शिक्षण आदी विषयांवर श्री. पगारे यांनी यावेळी चर्चा केली. नवीन राष्ट्रीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे विविध उपक्रम , वाचन लेखन या बरोबरच समजपूर्वक वाचन, आकलन, साहित्याचा रसास्वाद यास असलेले महत्त्व या विषयावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी बृहन्मुंबई मधील विविध शैक्षणिक गुणवत्तेचे कार्यक्रम व इंद्रधनुष्य उपक्रम याविषयी माहिती दिली.या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, संजय चव्हाण, वर्षा घुगे यांनी अनुक्रमे सोलापूर, कोल्हापूर, नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक श्री.पगारे यांनी निपुण भारतचे ध्येय, भाषासाक्षरता , संख्यज्ञान, स्टार प्रकल्प व समग्र शिक्षा अभियान या विषयावर सादरीकरण केले.शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व संध्या गायकवाड यांनी सांगली व पुणे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले.
कृषी विभागाचे संचालक रावसाहेब भागडे यांनी शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश या विषयावर सादरीकरण केले.नवसाक्षरता अभियानाचे स्वरुप व क्षेत्रीय यंत्रणेची जवाबदारी या विषयावर योजना संचालनालयाचे संचालक डॉ.महेश पालकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी बदलती पाठ्यपुस्तके या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.तदनंतर प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातील शिक्षणाचा सुधारित आकृतीबंध या विषयावर मुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
विविध क्षेत्रीय अधिकारी यांनी या मुक्त चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला.चर्चासत्रात शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी शिक्षणातील प्रमुख प्रश्नांवर अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांच्या समारोपपर मार्गदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली.कार्यशाळेचे सूत्रसंचालन परिषदेतील संशोधन विभागाचे विभाग प्रमुख डॉ.दत्ता थिटे यांनी केले.प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले.