ल्युमिनसने (Luminous) बॅटरीसह इंटेग्रेटेड इन्व्हर्टर ही नव्या युगाची “लि-ऑन (Li-ON)” सिरीज सादर केली.
पुणे
Luminous इन्व्हर्टर आणि बॅटरी क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या ल्युमिनस पॉवर टेक्नोलॉजीजने बाजारामध्ये नवीन उत्पादनाची श्रेणी सादर केली आहे. लिथियम-आयन(Lithium-ion) बॅटरी इंटेग्रेटेड इन्व्हर्टर ही नवीन इन्व्हर्टर सिरीज “लि-ऑन (Li-ON)” च्या आरंभाची घोषणा नुकतीच करण्यास आली.
पॉवर स्टोअरेज व्यवसायाचे भविष्य मानले जाणाऱ्या लि-आयन बॅटरींवर नवीन सिरीज तयार केली गेली आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय विज्ञानदिनामध्ये विषय असलेल्या ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकिकृत दृष्टीकोन’ या विचारावर आधारित ही श्रेणी आहे. नवीन इन्व्हर्टर सिरीज ही दीर्घकाळ टिकणारी, सुरक्षित, कॉम्पॅक्ट, अधिक कार्यक्षम असून विना देखभाल अधिक गुणवत्तापूर्ण आहे. ‘लि-ऑन ही श्रेणी ग्राहकांसाठी विशेष रचनात्मक संशोधन करुन बनवली आहे.
ल्युमिनस पॉवर टेक्नोलॉजीजचे व्यवस्थापकिय संचालक विपुल सभरवाल म्हणाले की, दर्जा आणि गुणवत्तेमधील उत्कृष्टतेसाठी आम्ही कटीबद्ध असून, आपल्या पर्यावरणासाठी चांगली आधुनिक उत्पादने तयार करण्याच्या क्षमतेचा अभिमान वाटतो. नव्या सिरिजद्वारे आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा पूरेपूर प्रयत्न करत आहोत. कोरोना महामारीनंतर ग्राहकांचे कोणतेही काम वीज खंडीत न होता सुरु ठेवणे हेच आमचे ध्येय आहे.
Luminous पारंपारिक बॅटरी इन्व्हर्टर्सपेक्षा तीन पटींने (3x) टिकणारी बॅटरी
या क्षेत्रात पहिल्यांदाच इन्व्हर्टर आणि बॅटरीवर पाच-वर्षांची वॉरंटी
लि-ऑन (Li-ON) 1250 ही बॅटरी इन्व्हर्टरसह एकाच संचात आहे. कमी कालावधीत फास्ट चार्जिंग सुविधा यामध्ये आहे. पूर्ण चार्जिंग हे केवळ 4 तासांमध्ये पूर्ण होते. ३ बीएचके घरे किंवा मोठे शो-रूम चालवण्यासाठी 1100 VA इन्व्हर्टर हा ५०% भारासह ३ तासांहून अधिक वेळेसाठी जास्तीत जास्त 880W लोडवर चालतो.
बाजारातील कोणत्याही बॅटरी आणि इन्व्हर्टरपेक्षा तिप्पट जीवनकालावधी, तिप्पट गतिमान चार्जिंग, सुसंगत बॅक-अप वेळ, देखभाल मुक्त आणि ५ वर्ष वॉरंटी असणारे नाविन्यपूर्ण उत्पादन ग्राहकांसाठी पर्वणीच आहे. नवीन श्रेणीतील इन्व्हर्टरमध्ये आधुनिक एलसीडी स्क्रिन आहे ज्याद्वारे चालू रिडींग, बॅटरी चार्जिंग वेळ आणि बॅकअप कळतो. यातील पॉवर बॅकअप सोल्युशन हे अधिक सुरक्षित आहे, वायरी, टर्मिनल्स हाताळताना त्याच्या संपर्कामधून अपघात होण्याचा धोका नाही. तसेच शॉर्ट सर्किट्सपासून उपकरणांचे रक्षण करण्यासाठीची इन-बिल्ट सुरक्षा यंत्रणा यामध्ये आहे. अॅसिड सांडणे अथवा विषारी धूर असा प्रकार यामध्ये नाही. त्यामुळे बॅटरीतील पाणी वारंवार बदलण्याची आवश्यक्ता नाही. याशिवाय, साधी प्लग आणि प्ले रचना असल्याने सहज आणि मोफत इन्स्टॉलेशनमुळे घरात वापरण्यास सुखकर आहे.
राकाँचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांची शालेय साहित्याची तुला
Luminous या क्षेत्रात पहिल्यांदाच इन्व्हर्टर आणि बॅटरीवर पाच-वर्षांची वॉरंटीही उत्पादने एचडीएफसी बँकेद्वारे 0% इएमआय योजनेवर उपलब्ध असेल. तसेच जुन्या बॅटरींच्या बदल्यात नवीन बॅटरी एक्चेंज सुविधा उपलब्ध आहे.
ल्युमिनसची नवीन इन्व्हर्टर सिरीजची किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये आहे. याशिवाय, देशभरामधील घराघरांमध्ये पोहोचण्यासाठी कंपनी ३५००० हून अधिक वितरक आणि डिलर्सच्या नेटवर्कचा वापर करण्याची योजना करत आहे.