*सिंधी प्रीमिअर लीग सीझन-४’चे शानदार उद्घाटन
– एएनपी केअर फाऊंडेशनला डायलिसिस मशीन सुपूर्द; अभिनेता तनुज विरवानी याची उपस्थिती
पिंपरी :
sindhi primier league season 4 सिंधी समाजातील तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहन देण्यासह सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सेवाभावी संस्थांना मदत करण्याच्या उद्देशाने होत असलेल्या ‘सिंधी प्रीमिअर लीग सीझन ४’चे शानदार उद्घाटन झाले. पिंपरीतील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ‘इनसाइड एज’ वेबसिरीज फेम अभिनेता तनुज विरवानी याच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यंदा सिंधी प्रीमियर लीगच्या वतीने एएनपी केअर फाऊंडेशनला डायलिसिस मशीन सुपूर्द करण्यात आले.
ही क्रिकेट स्पर्धा २२ फेब्रुवारी पर्यंत रंगणार आहे. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग या युट्युब चॅनेलवर होत आहे. उद्घाटनप्रसंगी एएनपी केअर फाऊंडेशनचे मनोहर फेरवानी, जवाहर कोटवानी, गुरुमुख सुखवानी, ऋषी अडवाणी, उद्योजक गणेश कुदळे, संयोजक
कन्वल खियानी, हितेश दादलानी, कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, कुणाल गुडेला, पियुष जेठानी आदी उपस्थित होते. यावेळी खेळाडूंबरोबर त्यांची मुले मैदानात आल्याने सर्वांचेच लक्ष वेधले जात होते.
कुटुंबीयांनी क्रिकेट सामने पाहण्याचा आनंद लुटला. सिंधी समाजातील तरुणांमध्ये खेळभावना रुजवण्यासाठी ही लीग महत्वाची आहे. संघभावना आणि प्रामाणिकपणे या खेळाचा आनंद घ्यावा, असे तनुज विरवानी याने यावेळी सांगितले.
उद्घाटनाचा सामना सिंधफूल रेंजर्स आणि पिंपरी योद्धाज यांच्यात रंगला. सिंधफूल रेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या पिंपरी योद्धाज संघाने ८.२ षटकांत ८ गडी गमावत ६१ धावा केल्या. सलामीवीर जितू वालेचाने २१
चेंडूत सर्वाधिक २४, तर मनीष कटारियाने ६ चेंडूत १४ धावा काढल्या. इतर फलंदाजांना दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. सिंधफूल रेंजर्सच्या यतीन मेंगवानी व यश रमनानी यांनी प्रत्येकी २ गडी, तर बंटी मेंगवानी व जितू पहलानी यांनी प्रत्येकी १ गडी बाद
केला. विजयासाठी ६२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानांत उतरलेल्या सिंधफूल रेंजर्सची संथ सुरुवात झाली. यतीन मेंगवानीच्या १७ चेंडूतील १९ धावा वगळता अन्य फलंदाजांना आपली छाप पाडता आली नाही. मनीष कटारिया आणि कुणाल गुडेला यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मयूर ललवानीने १ गडी बाद केला. पिंपरी योद्धाजने सिंधफूल रेंजर्सवर १३ धावांनी विजय मिळवला.
रोहित मोटवानीची गोलंदाजीत छाप
दुसरा सामना मोहेंजोदरो वॉरियर्स आणि आर्यन युनाटेड यांच्यात झाला. आर्यन युनायटेडकडून कर्णधार म्हणून खेळणाऱ्या महाराष्ट्राचा रणजीपटू रोहित मोटवानी याच्या खेळाचे आकर्षण या सामन्यात होते. प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्सने निर्धारित ९ षटकांत ५ गडी
गमावत ६५ धावा केल्या. सनी सुखेजाने सर्वाधिक २७, तर करण श्रॉफ आणि जयेश मायराना यांनी प्रत्येकी १२ धावा केल्या. रोहित मोटवानीने भेदक मारा करत ३ गडी बाद केले. फलंदाजीत मात्र त्याला छाप पाडता आली नाही. ६६ धावांचे विजयी लक्ष्य घेऊन मैदानात
उतरलेल्या आर्यन युनायटेडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर तुषार अहुजा (२) पाठोपाठ रोहित मोटवानी अवघ्या दोन धावा काढून बाद झाला. लागोपाठ गडी बाद होत गेल्याने व धावांची गती मंदावल्याने आर्यन युनायडेटला केवळ ४३ धावा करता आल्या. वॉरियर्सने हा सामना २२ धावांनी जिंकला.
जगन्नाथ रथयात्रा पुणे महामहोत्सव जल्लोषात साजरा
या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी निगडित आहे. त्यामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (आशुतोष चंद्रमणि, चंद्रमणि असोसिएट्स), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम
सेमीकंडक्टर, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (अनूप झमतानी, झमटानी ग्रुप), एसएसडी फाल्कन (विकी सुखवानी, सुखवानी लाइफस्पेस), इंडस डायनामॉस (सुमित बोदानी, शगुन टेक्सटाईल), दादा वासवानीज ब्रिगेड (अनिल अस्वाणी, अस्वाणी प्रमोटर अँड
बिल्डर), झुलेलाल सुपरकिंग्ज (पियुष जेठानी, जेठानी ग्रुप), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (बिपिन डाखनेजा, ट्रिओ ग्रुप), गुरुनानक नाइट्स (प्रकाश रामनानी, पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड), संत कंवरम रॉयल्स (क्रिश लाडकानी, विजयराज असोसिएट्स), आर्यन युनायटेड (राजीव
मोटवानी, रोहित इन्फ्रा), जय बाबा स्ट्रायकर्स (सागर सुखवानी, सुखवानी असोसिएट्स), सिंधी इंडियन्स (मनीष मनसुखवानी, मनसुखवानी असोसिएट्स), अजराक सुपरजायंट्स (हितेश दादलानी, लाइफक्राफ्ट रियल्टी) व पिंपरी योद्धाज (कुणाल लखानी, सोहम मोबाईल) अशी या संघांची नावे आहेत.
सुखवानी लाईफ स्पेसेस (विकी सुखवानी), एएनपी कॉर्प (ऋषी अडवाणी), नुरिया होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर सुखवानी), एसएम ग्रुप (सागर मुलचंदानी), रवि बजाज आणि रोहित तेजवानी, रिशा वॉच स्टोअर (जॅकी दासवानी), तेजवानी हॅण्डलूम्स अँड फर्निसिंग्स (अवि
तेजवानी), सेवानी इन्शुरन्स (हर्ष सेवानी), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), एसएसडी एक्स्पोर्ट हॉंगकॉंग लिमिटेड (वरून वर्यानी), कोमल असोसिएट्स (बग्गी मंगतानी), लीगसी ग्रुप (नरेश वासवानी), बालाजी होम्स (आशुतोष चान्दिरमणी), क्लासिक कलेक्शन (नीरज चावला),
जीएस असोसिएट्स (जितू पहलानी), साईबाबा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (रोहन गेहाने), रजनीता इव्हेंट्स (निखिल अहुजा), देवी काँक्रीट प्रोडक्ट (जितेश वनवारी), सिटी कार्स (रॉकी सेवानी), ग्लो वर्ल्ड (महान जेस्वानी), जय मोबाईल (गोपी आसवानी) यांचे या स्पर्धंसाठी
सहकार्य लाभले आहे.