Friday, November 8, 2024

*अॅक्शनपॅक्ड ‘सूर्या’ चित्रपटगृहात*

*अॅक्शनपॅक्ड ‘सूर्या’ चित्रपटगृहात*

पुणे: दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीने अनेक दमदार अॅक्शनपट बनवले आहेत. सतत नावीन्याचा शोध घेत नवनवीन प्रयोग करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीनेही ‘सूर्या’ हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स, डीके निर्मित सुर्या या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. ६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

“मी कोणाच्या नादी लागत नाही आणि ज्याच्या लागतो तो उरत नाही, अशी धमकी देत सुर्याने त्याच्या शत्रूच्या मनात कशी दहशत निर्माण केली आहे? आपलं प्रेम आणि कुटुंब यांच्या संरक्षणासाठी ‘सूर्या’ नेमकं काय करतो? शक्ती आणि युक्तीच्या बळावर कोणत्या नीतीचा अवलंब करून ‘सुर्या त्याच्या शत्रूंना कसे नेस्तनाबूत करणार? हे चित्रपटात पाहणं रंजक आहे. विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर रंगणारं सूडनाट्य प्रेक्षकांना ‘सूर्या’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. सामान्य माणूस आणि सिस्टिम यांचा संघर्ष आणि एकजुटीच्या ताकदीतून लढा कसा जिंकता येतो हे दाखवताना त्याला प्रेमकथेची, कौटुंबिक भावनिक नात्याची किनार आहे. धडाकेबाज अॅक्शनसोबत इमोशन्स, रोमान्स असं भरगच्च पॅकेज असलेला ‘सूर्या’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी आहे.

अभिनेता प्रसाद मंगेश याच्यासोबत अभिनेत्री रुचिता जाधव नायिकेच्या रूपात दिसणार आहे. या दोघांसोबत या चित्रपटात हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, पंकज विष्णु, अरुण नलावडे, गणेश यादव, संजीवनी जाधव, देवशी खांडुरी, हॅरी जोश, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बो-हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

उगवला पराक्रमी सुर्या सुर्या, मन गुंतता गुंतता, रापचिक रापचिक कोळीणबाई, मी आहे कोल्हापूरची लवंगी मिरची, बेरंग जवानी अशी वेगवेळ्या जॉनरची पाच गाणी चित्रपटात आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान, मंगेश ठाणगे, प्रशांत हेडव यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. सुखविंदर सिंग, आदर्श शिंदे, नेहा राजपाल, राजा हसन, ममता शर्मा, कविता राम, खुशबू जैन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहे.

या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सहनिर्मिती प्रसाद मंगेश, चेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत. कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस. राव यांचे आहे. अॅक्शन डिरेक्टर अब्बास अली मोगल आणि मोझेस फर्नाडिस आहेत.या पत्रकार परिषदेत डॉ विजय ठाकरे, चैतन्य जोशी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles