*नागरिक आणि खासदार यांच्या मदतीने विंझर गावचा विकास*
*हर घर नळ से जल योजना अंतर्गत विंझर गावच्या प्रत्येक घरात पाणी मिळणार* ( *जल जीवन मिशन योजना* )
*प्रकाश जावडेकर* *( माजी केंद्रीय मानव संसाधन व वनमंत्री भारत सरकार )*
आज पुण्यातील वेल्हे तालुक्यातील विंझर हे गाव *प्रकाश जावडेकर* *( माजी केंद्रीय मानव संसाधन व वनमंत्री भारत सरकार )* यांनी सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतले ..या प्रसंगी प्रकाश जावडेकर साहेबांचे भव्य असे स्वागत विंझर ग्राम पंचायत यथे करण्यात आले..या वेळी गावातील महिलांनी औक्षण करून प्रकाश जावडेकर साहेब यांचे स्वागत केले..या वेळी व्यासपीठावर सुनील भोसले ( सरपंच विंझर गाव ) ,तहसीलदार शिवाजीराव शिंदे वेल्हे तालुका ,हनुमंत आण्णा शिंदे ( संचालक अमृतेश्वर महाविद्यालय विंझर ), नीलम सागर ( ग्राम पंचायत सदस्य ) ,संभाजी भोसले ( माजी सरपंच विंझर गाव ) आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते..
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील विंजरगाव हे माननीय माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर साहेब यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दत्तक घेतलेले आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करणे या योजने अंतर्गत विंझर गाव दत्तक घेतले आहे..
या वेळी नवीन रेशन कार्ड ,नवीन 7 /12 उतारा, संजय गांधी पेन्शन योजना चे वाटप या वेळी प्रकाश जावडेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले
*प्रकाश जावडेकर* *( माजीकेंद्रीय मानव संसाधन व वन मंत्री भारत सरकार )* – पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आदर्श गाव योजना 2014 साली अंमलात आणली..राज्य सरकार आणि केंद्र सरकार च्या सर्व योजना या गावा पर्यंत पोहोचली गेली पाहिजे.. स्वामित्व योजनेची आपण लवकरच अमलबजावणी करणार आहोत…शेतकरी यांनी नैसर्गिक शेती कडे वळले गेले पाहिजे…आपण सर्वांनी मिळून विंझर गावाचा विकास केला पाहिजे…गावातील प्रत्येक विद्यार्थी यांना उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे…शिक्षण उत्तम असेल तर गाव पुढे जातात…सर्व सरकारी योजना या गावातील प्रत्येक नागरिकांना मिळाला पाहिजे…अटल पेन्शन योजना , सुकन्या समृद्ध योजना अश्या अनेक योजनचा फायदा आपण घेतला पाहिजे…मध्य प्रदेश येथील खुंटीया गाव मी आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतले होते..खुंटीया गावाचा 2 वर्षात विकास झाला आहे… हर घर नळ से जल योजना ( जल जीवन मिशन योजना ) विंझर गावाला लवकरच उपलब्ध होणार आहे…लवकरच विंझर गावच्या प्रत्येक घरातून नळातून पाणी मिळणार आहे…3 कोटी 8 लाख रु हर घर नळ से जल योजने साठी विंझर गावाला मंझुर झाले आहे…
*हनुमंत आण्णा शिंदे* ( संचालक अमृतेश्वर महाविद्यालय विंझर ) पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या स्वप्नातील आदर्श गाव आपण निर्माण केला पाहिजे..गावचे सुशोभित करावा गावाचा कायापालट करण्यासाठी आदर्श ग्राम योजने मुले गावातील लोकांना काम मिळणार आहे