दी पूना गुजराती केळवणी मंडळा’च्या ‘आरसीएम गुजराती हायस्कूल’मध्ये जावडेकर यांच्या खासदार निधीतून अद्ययावत व्यायाम शाळेचे उद्धगाठणं पुणे
पुणे, दि. 14 – शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा प्रसन्न राहण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. वाढत्या व्यसनाधिनतेपासून मुलांना मुक्त करून चांगल्या मार्गाला लावायचे असेल, तर व्यायामशाळा उभारल्या पाहिजेत, असे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
‘दी पूना गुजराती केळवणी मंडळा’च्या ‘आरसीएम गुजराती हायस्कूल’मध्ये जावडेकर यांच्या खासदार निधीतून अद्ययावत व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. तिचे उद्घाटन करताना जावडेकर बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे, संस्थेचे अध्यक्ष मोहन गुजराथी, राजेश शहा, डॉ. ए. पी. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर म्हणाले, “आश्वासक खेळाडूंना शिक्षक शोधतो, प्रशिक्षण देत असतो. खेळासाठी आवश्यक साहित्य, पोषण आहार पुरविण्याची व्यवस्था समाज आणि क्रीडा संस्थांनी करणे महत्त्वाचे काम आहे. मोदी सरकारने खेळाडूंना शिक्षक, प्रशिक्षण, स्पर्धेसाठी प्रवास अशा विविध सुविधा दिल्या. त्यामुळे खेळाविषयी आत्मीयता निर्माण झाली आहे. जाणीवपूर्वक केलेल्या या प्रयत्नांचे फळ म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू मोठ्या सं‘येने पदके मिळवित आहेत.”
जावडेकर पुढे म्हणाले, “व्यायाम केल्याने सौंदर्य प्रसाधने वापरावी लागत नाहीत. सौंदर्य आतून खुलते आणि ते चेहर्यावर दिसते, आरोग्य चांगले राहून हालचाली आणि चपळता वाढते. नवे खेळाडू खेड्यातून येतात त्यांचा अभिमान वाटतो. कॉन्व्हेंट शाळांमध्ये मुलांना घालणार्या पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच जिद्दीने खेळणार्या या खेळाडूंच्या कहाण्या मुलांना सांगितल्या पाहिजेत.
शमा गद्रे यांनी सूत्रसंचालन, रेणू तारे यांनी परिचय, किरीट शहा यांनी स्वागत आणि जनक शहा यांनी आभार मानले.
राजकारणी असून अभ्यासू..!
राजकारणी अभ्यासू असू शकत नाही, असा समाजाचा मोठा गैरसमज आहे. पण तो चुकीचा आहे. आठशे खासदारांपैकी 700 खासदार पदवीधर आहेत. चारशे खासदार द्विपदवीधर आहेत. दोनशे खासदारांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. विविध विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. समित्यांमध्ये होणार्या सर्वपक्षीय चर्चांतून त्यांची अभ्यासूवृत्ती दिसून येते.