दुर्गोत्सव….
*’सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ व ‘अग्रदुत बांगो समाज’ यांच्या वतीने*
*महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुर्गोत्सवाचे खराडीत आयोजन*
पुणे : सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आणि अग्रदूत बांगो समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुर्गाेउत्सवाचे खराडीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. हा दुर्गोत्सव ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे, असे फाउंडेशनचे संस्थापक सुरेंद्र पठारे यांनी कळवले आहे.
दुर्गोत्सवात संगीत, नृत्य, अन्नदान, वृक्ष लागवड, ब्लाइंड फोल्डेड मॅरेथॅान अशा समाजपयोगी कार्यक्रमासह दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोलकाता मधील प्रसिद्ध व्हिक्टोरिया मेमोरियल उभारण्यात आले असून, हेही या दुर्गोत्सवाचे आकर्षण राहणार आहे. या काळात अग्रदुत समाजाच्या अनेक महापुजा व त्यानंतर प्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
येथे फुड स्टॅालही असणार आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रीयन आणि बंगाली खाद्यपदार्थ खवय्यासांठी उपलब्ध असणार आहे. याच दुर्गोत्सवाच्या काळात सीएसआरअंतर्गत खराडी परिसरात वृक्षलागवड, पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन, विद्युत वाहने वापरण्यास जागृत करणे याविषयीच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
दुर्गोत्सव कार्यक्रमासाठी लाईव्ह म्युझिक कार्यक्रम आयोजित केला आहे. २ ऑक्टोबरला भूमी बॅंड, ३ ऑक्टोबरला विनोद राठोड आणि ४ ऑक्टोबर रोजी मिस. जोजो यांचा संगीताचा कार्यक्रम असणार आहे. हे सर्व कार्यक्रम आणि विशेष आकर्षण असणारा व्हिक्टोरिया मेमोरियल हा रॅडीसन ब्लू हॅाटेलच्या पाठीमागे खराडी हडपसर रोड या ठिकाणी असणार आहे. ३० सप्टेंबर रोजी गरबा दांडीयाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.