*राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष डॉ.सुनील जगताप यांचा सत्कार*
…………………………………………..
लोकसेवा हा उद्देश ठेऊन डॉक्टर सेलने कार्यरत राहावे : खा. वंदना चव्हाण
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष डॉ.सुनील जगताप
यांचा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .डॉक्टर सेलच्या डॉ.शिवदीप उंद्रे,डॉ.धैर्यशील पवार,डॉ.योगेश गोसावी,डॉ.विजय जाधव या नवनियुक्त विभागीय अध्यक्षांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. खा.वंदना चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते अंकुश काकडे यांच्याहस्ते हा सत्कार कार्यक्रम झाला. आमदार सुनील टिंगरे, महिला आघाडी शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, प्रदीप देशमुख,नीता कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘ डॉक्टर सेलने चांगली संघटना बांधावी.लोकांची सेवा हा उद्देश डॉक्टर सेलने ठेवावा. कोविड काळात राष्ट्रवादी डॉक्टर सेलने पुण्यात मोठे सेवाकार्य केले. डॉ. जगताप हे शांत, संयमी तरीही प्रभावी व्यक्तीमत्व आहे.ते डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्षपदाला न्याय देतील. त्यांनी या माध्यमातून युवकांना पुढे आणावे.
अंकुश काकडे म्हणाले, ‘ पुणे शहराला डॉक्टर सेलची चांगल्या कामाची परंपरा आहे. पुण्यात पक्षाचे काम चांगले करणाऱ्या सेल अध्यक्षाला प्रदेश पातळीवर संधी मिळत गेली आहे. आपत्तीत मदत करण्याची परंपरा डॉक्टर सेलला आहे. गणेशोत्सवात राष्ट्रवादी डॉक्टर सेलने फिरती वैद्यकीय पथके कार्यरत ठेवावीत.
प्रशांत जगताप म्हणाले, ‘ डॉक्टर सेलच्या सेवाकार्याची नोंद राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या पध्दतीने ठेवेल. मोठया खर्चाच्या शस्त्रक्रियांच्या संदर्भात डॉक्टर सेलने सर्वसामान्य रुग्णांना आणि नातेवाईकांना मार्गदर्शन करावे. ‘
आमदार सुनील टिंगरे यांनीही मनोगतातून शुभेच्छा दिल्या.डॉक्टर सेलच्या विस्तारासाठी उपयुक्त सूचना केल्या. शासकीय वैद्यकीय उपचारांच्या योजनांबद्दल डॉक्टर सेलने लोकप्रतिनिधींचे प्रबोधन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. सुनील जगताप म्हणाले, ‘ डॉक्टर सेलच्या कामाची दखल सर्वत्र घेतली जाते.डॉ. दिलीप घुले, डॉ. नरेंद्र काळे या आधीच्या प्रदेशाध्यक्षांच्या चांगल्या कामाचा वारसा पुढे नेऊ. डॉक्टरांवर हल्ले होत असतील तर १५ मिनिटात २५ डॉक्टर पोचून गंभीर प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करतात, अशी आम्ही पुण्यात सुरू केलेली व्यवस्था राज्यभर नेऊ. रक्तदान शिबिराची चळवळ पुढे नेणार आहोत. ‘
डॉ. रणजीत निकम, डॉ. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शशीकांत जगताप यांनी प्रास्ताविक केले.डॉ. राजश्री पोकर्णा यांनी आभार मानले.
डॉ. रश्मी बापट, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ.राहुल सुर्यवंशी, डॉ.परशुराम सुर्यवंशी, डॉ.मनीषा सोनवणे, डॉ. प्रताप तुसे,डॉ. संगीता खेनट, डॉ. राजेश साठे, डॉ. योगेश गोसावी,मानस घुले इत्यादी या वेळी उपस्थित होते.