*देशातील सर्वात मोठी
पहिली एकत्रित सार्वजनिक गणेश मिरवणूक धनकवडीत*
(३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपयर्र्ंत)
पुणे, २२ ऑगस्टः ‘सन्मान प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा, अभिमान प्रत्येक कार्यकर्त्यांचा’, या उक्ती प्रमाणे शहरातील ९ सार्वजनिक गणशे मंडळे एकत्रित येऊन नवा इतिहास रचत आहेत. या मंडळांच्या माध्यमातून देशातील पहिल्या सर्वात मोठ्या एकत्रित सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणुक काढण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार बनण्यासाठी सर्व पुणेकरांना व गणेश भक्तांना आवाहन करण्यात आले आहे की ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निघणार्या मिरवणुकीत सहभागी व्हावे. असे आवाहन मोहननगर मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिरूद्ध येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मिरवणुकीचा मार्ग गुलाबनगर, धनकवडी ते मोहन नगर, धनकवडी असा असणार आहे.
पोेलिस विभागाने केलेल्या आवाहानांचा सन्मान राखत धनकवडीतील ९ गणेश मंडळे ज्यात केशव मित्र मंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळांच्या अध्यक्षांनी एकत्रित येऊन हा नवा पायंडा पुण्यात नव्हें तर संपूर्ण देशात प्रथमच सुरू केला आहे.
समाजाप्रती आपले काही देणे असते ही भावना लक्षात ठेऊन या मंडळांच्या वतीने संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबविले जाणार आहेत. त्यात वृक्षारोपण, रक्तदान, कोविडमधील गरजुंना मदत याच बरोबर जवळपास विविध ७५ सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केलेल्या हा सार्वजजिक गणेशोत्सव ज्यांची ताकद ओळखून लोकमान्य टिळक व दगडूशेठ हलवाई यांनी मोठ्या प्रमाणात या उत्सवाचा प्रचार आणि प्रसार केला होता. त्यांनी जनतेला एकत्रित आणून त्या ताकदीचा सत्कार्यासाठी उपयोग केला.
पण मधल्या काळात अनेक ठिकाणी उत्सवाच्या मूळ हेतुलाच धक्का लागल्याच्या अनेक घटना घडल्या. या उत्सवाच्या सांस्कृतिकपणाला गालबोट लागले आणि तोच मुळ हेतू साध्य करण्यासाठी व सांस्कृतिक वारसा जपण्याच्या हा एका छोटासा प्रयत्न केला आहे.
भक्ती, उमंग, उत्साह, जोश या सर्व गोष्टी गणेशोत्सवात प्रत्येक भक्तामध्ये दिसून येतो. पण मधल्या काळात कोरोनामुळे सार्वजनिक गणेश मंडळांवर बंदी आणल्यामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नाही. परंतू कोरोनाची सकंट टळल्यामुळे या वर्षी संपूर्ण राज्यात त्यातल्या त्यात पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. धनकवडीतील मंडळांनी एकत्रित येऊन जे धाडस दाखविले आहे. ती पद्धत हळूहळू समाजात रुजावी. असे ही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला विजय क्षिरसागर, अनंत शिंदे, विकास मदणे, मिलिंद काळे, सोमनाथ शिर्के, समिर दिघे, चेतन चव्हाण, सुनील पिसाळ, प्रतिक कुंभारे, युवराज शिंदे, मयूर बुरसे, गुरूनाथ साळुंके, अथर्व देशपांडे, विशाल निगडे, अभिषेक तापकीर, अजय इंगळे, अभिजित भोपळे, शिरीष देशपांडे सागर साबळे , विजय क्षिरसागर, प्रतिक कुुंभारे, अभिषेक तापकीर आणि समीर दिघे आदि कार्यकर्ता उपस्थित होते.
तसेच ज्ञानप्रबोधिनी वाद्यपथकचे प्रमुख अभिषेक जोग व युवा वाद्यपथकचे प्रमुख अॅड. अनिष पाडेकर व वैभव वाघ उपस्थित होते.