राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचे विरोधात सातत्याने जाणीवपूर्वक बदनामी होईल अशा हेतूने वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुण्यात विश्रामबाग पोलीस स्टेशनला तक्रार
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचे विरोधात सातत्याने जाणीवपूर्वक बदनामी होईल अशा हेतूने वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुण्यात विश्रामबाग पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आला तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अश्या आशयाचे निवेदन पुण्याचे पोलीस कमिश्नर अमिताभ गुप्ता यांना देण्यात आले .*
राजकीय संस्कृती जोपासत राजकारण विरहित मैत्री जपणाऱ्या महाराष्ट्र राज्याची राजकीय परंपरा ही देशात अतुलनीय अशी मानले जाते. गेल्या काही दिवसांत या राजकारणाला गलिच्छ स्वरूप देण्याचे काम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. निव्वळ विरोधी पक्षाच्या नेत्यांवर शिवराळ भाषेत आरोप करण्यासाठी त्यांनी गोपीचंद पडळकर नावाच्या व्यक्तीला आमदार केले. मुळात बारामती विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या व्यक्तीला विधानपरिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाची आमदारकी बहाल करणे,
ज्या विधानपरिषदेत ज्येष्ठ साहित्यिक लेखक कला क्रीडा संस्कृती या क्षेत्रातील जेष्ठ मान्यवरांना संधी दिली जाते, अशा सभागृहात गोपीचंद पडळकर नावाच्या टुकार टारगट व्यक्तीला आमदार म्हणून पाठवण्याचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी केले. परंतु आता हे पाप महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी तापदायक ठरत आहे गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांत देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब, आदरणीय विरोधी पक्षनेते अजितदादा या सर्वांच्याबाबत अतिशय चुकीची व महाराष्ट्राच्या संस्कृती संस्कृतीला घातक अशी वक्तव्य करत आहेत.
मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणे साहजिकच आहे परंतु भाजपाचे आमदार श्री गोपीचंद पडळकर हे सातत्याने आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची बदनामी करीत असून त्यांचे वारंवार प्रतिमा हनन करीत आहेत, हे अतिशय गंभीर आणि खेदजनक आहे.
श्री गोपीचंद पडळकर हे सातत्याने वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना खोटी आणि बिनबुडाची माहिती पसरवित आहेत.
नुकतेच त्यांनी
“राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा मफलर टाकून घोषणा देतात.”
” उदय सामंत यांच्या गाडीवरील ह्लल्यामागे पवारांची माणसं होती ”
” उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारी ‘पवारांची माणसं’ होती ”
अशी बेजबाबदार आणि खोटी विधाने केली. त्यांचे हे विधान अतिशय गंभीर असून आमच्या सामाजिक व राजकीय संस्कृतीला धक्का पोहोचविणारे आहे. आम्ही या विधानाचा जाहिर निषेध करीत असून त्यांनी आमचा पक्ष व सर्वोच्च नेत्याच्या विरोधात खोटीनाटी माहिती पसरवून आमची बदनामी केलेली आहे. याबद्दल त्यांच्यावर योग्य त्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांनी केली आहे. सदर प्रसंगी प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख ,दिपाली धुमाळ रविन्द्र माळवादकर ,वनराज आंदेकर , दत्ता सागरे , महेंन्द्र पठारे ,किशोर कांबळे , मोहसिन शेख ,दिपक पोकळे , रूपाली पाटील , गोरख भिकुले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.