Saturday, August 2, 2025
HomeMarathi newsउंच इमारतींमध्ये आग लागू नये यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज ...

उंच इमारतींमध्ये आग लागू नये यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज *राज्याचे अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांचे प्रतिपादन*

उंच इमारतींमध्ये आग लागू नये यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज

*राज्याचे अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांचे प्रतिपादन*

निर्धोक आणि सुरक्षित उंच इमारतींसाठी परिसंवाद संपन्न

पुणे, दि २५ जुलै : राज्यातील शहरांचा झपाट्याने विकास होत असून मोठ्या प्रमाणात उंच टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेचा अभाव असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले. त्यामुळे अशा ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्यास मनुष्यहानीसोबत, इतर साधनसंपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान अग्निसुरक्षेचे नियम पाळून टाळता येण्यासारखे आहे. त्यामुळे याकडे तितक्याच गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. उंच इमारती उभारताना त्या अग्निसुरक्षेच्या दृष्टीने सक्षम आहेत की नाहीत, याचा विचार करून उभारणे आवश्यक आहे. अशा इमारतींसाठी अग्निशमन कायद्यामध्ये तरतुदी आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आगीचा धोका कायम राहतो. त्यामुळे आगीच्या घटना घडल्यानंतर अग्निसुरक्षेची चर्चा करण्यापेक्षा आग लागू नये, यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी व्यक्त केले.
फायर अॅन्ड सेक्युरिटी असोशिएशन ऑफ इंडीया (FSAI)च्या वतीने उंच इमारती आणि त्याबद्दलची सुरक्षा यासंबंधी एका परिसंवादाचे आयोजन नुकतेच बाणेर येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (IISER) मुख्य सभागृहामध्ये करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वारिक हे मार्गदर्शन करत होते. या परिसंवादामध्ये अनेक दिग्गज उपस्थित होते व महत्वाच्या विषयांवर येथे चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. फायर अँड सेक्युरिटी अससोसिएशन ऑफ इंडियाचे अनेक कार्यक्रम वर्षभर होत असतात त्यातीलच हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे.
यावेळी एफएसएआय राष्ट्रीय अध्यक्ष अजित राघवन, गोवा राज्याचे अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा माजी संचालक आणि एफएसएआयचे राष्ट्रीय सचिव अशोक मेनन, उंच इमारती आणि नागरी वस्ती परिषदच्या (CTBUH India) संचालिका अनुजा सावंत, एफएसएआय पुणे अध्यक्ष नितीन जोशी, सचिव अर्चना गव्हाणे, त्रिकोलनाथ तिवारी, संयोजक अजित यादव, पूजा गायकवाड, सुजल शहा शेठ, शशांक कुलकर्णी, सिंपल जैन, आनंद गाडेकर, अनुजा कर्हू उपस्थित होते.
वारिक म्हणाले की, बांधकाम व्यवसायिक, विकासक, वास्तुविशारद, संरचनात्मक अभियंता आणि इमारत स्थैर्य दर्जा अधिकारी यांच्या सहभागानेच अग्निसुरक्षेची जबाबदारी पार पाडता येणार आहे. राज्य सरकारने नुकतेच ७० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसवणे आणि चालवणे बंधनकारक केले आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये उंच इमारतींच्या अनेक विकासकांनी अ-प्रमाणित किंवा कमी दर्जांची फायर इव्हॅक्युएशन सोल्यूशन्स/लिफ्ट्स स्थापित केली आहेत किंवा सध्या निवडत आहेत. तथापि, बांधकाम व्यावसायिक आणि नियमित प्रवासी लिफ्ट निर्मात्यांद्वारे गुणवत्तेशी तडजोड केल्यामुळे ही मानांकन नसलेले फायर सोल्युशन्स/इव्हॅक्युएशन लिफ्ट लोकांना आग लागल्यास योग्य सुरक्षा आणि सुरक्षा प्रदान करू शकत नाहीत. याउलट, फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट्स हा अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय असल्याचे वारिक म्हणाले.
एफएसएआय तयार करत असलेले सुरक्षा मानांकन उंच इमारतींच्या अग्निसुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरेल असे प्रतिपादन एफएसएआयचे माजी अध्यक्ष पंकज धारकर यांनी यावेळी केले. तसेच जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या प्रणालींचे विस्तृपणे मार्गदर्शन केले.
ग्रीन बिल्डींग सल्लागार पंकज धारकर, वरिष्ठ असोसिएट आर्किटेक्ट पुष्यमित्र लोंढे, FOGTEC फायर प्रोटेक्शन भारताचे संचालक जॅक्सन जोस, एसएएस पॉवरटेक कार्यकारी संचालक नरेंद्र दुवेदी, सौरव चट्टोपाध्याय, संचालक, ग्रुन डिझाईन्स सूरज नायर, केपीएम सल्लागार कंपनीच्य मुख्य अभियंता प्रीती पुजारी, ओरिएंट फायर कर्टेन्स इंडिया (इंडो ब्रिटिश जॉइंट व्हेंचर) संचालक आणि व्यवस्थापकीय भागीदार रमण कपूर, स्टर्लिंग अभियांत्रिकी सल्लागार सेवेचे संचालक गिरीश द्रविड, हितक्षी सेफ्टी सोल्युशन्सचे सीईओ सुबोध अरोरा, बुरो हॅपोल्ड समूह संचालक मनीष नेगांधी, मुख्य सल्लागार टॅक मॅथ्यूज, लुब्रिझोल चे गौरव चट्टोपाध्याय या सर्व मान्यवरांनी विविध विषयावरिल मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Access Denied

Access Denied

Access Denied

Access Denied

Recent Comments