सविता मदनलाल शेटीया यांना यू. एस. ए. मधील आंतरराष्ट्रीय संस्था ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी तर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान
यू. एस. ए. मधील आंतरराष्ट्रीय संस्था ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी ही आंतरराष्ट्रीय संस्था महिला सक्षमीकरणाचे काम करत असून , विविध नॉन अकॅडमीक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मानद डॉक्टरेट ही प्रदान करते.
पुण्यातील सविता मदनलाल शेटीया या करत असलेल्या ‘सामाजिक कार्यातील परिणामकारकता’ यासाठी त्यांना ऑनरेबल डॉक्टरेट (मानद विद्यावाचस्पती) ही पदवी प्रदान करण्यात आली . यापूर्वी विविध संस्थांकडून शेटीया यांना त्या करत असलेल्या सामाजिक कार्यासाठी विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
२२ जुलै २०२२ सविता शेटीया यांचा वाढदिवस , सोना पांडे मॅडम यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, या दिवशी ही मानाची पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. शेटीया यांनी ‘ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमीच्या’ संस्थापिका सोना पांडे मॅडम यांचे आभार व्यक्त करत , असेच कार्य पुढे करत राहू असे आश्वासन दिले.