Friday, November 8, 2024

बालगंधर्वांच्या गायकीत ईश्वरी अंश ः-  विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर

बालगंधर्वांच्या गायकीत ईश्वरी अंश ः-

 विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर

पुणेः- भास्करबुवा बखले यांचे बालगंधर्व आणि कृष्णराज फुलंब्रिकर  हे दोन शिष्य. दोघे गायक शिष्य हे पट्टीचे गायक. दोघांच्या गळ्याची जात वेगळी त्या नुसार बखलेबुवा त्यांना गाणे शिकवत. बखले गुरुजीच्या मार्गदर्शनात गायनाची तालीम सुरुच होती आणि कालांतराने बालगंधर्वांनी गायकीच्या क्षेत्रात अद्भभूत कार करुन ठेवले. बालगंधर्वांच्या गायकीत ईश्वरी अंश होता असे म्हटल्यास अतीशोक्ती होणार नाही असे गौरवोद्गार विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी काढले.

बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे बालगंधर्वांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा “बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार” यावर्षी ठाण्याचे पं. मुकुंद मराठे याना विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी अभ्यंकर बोलत होते. ५१ हजार रु. रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप अाहे.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, बुलडाणा नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्याधिकारी शिरीष देशपांडे व कर – सल्लगार विजयकांत कुलकर्णी,  मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर व कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमात रंगगंधर्व या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले

याच समारंभात पुण्याचे सुहास वाळुंजकर याना आण्णासाहेब किर्लोस्कर (१५ हजार + स्मृतिचिन्ह), पुण्याच्या डॉ. शशिकला शिरगोपीकर याना भास्करबुवा बखले (१० हजार + स्मृतिचिन्ह), पुण्याचे विश्वास पांगारकर यांना गो. ब. देवल (१० हजार + स्मृतिचिन्ह), सांगलीचे अभिषेक काळे याना काकासाहेब खाडिलकर (१० हजार + स्मृतिचिन्ह), पुण्याचे अभिजित जायदे यांना डॉ. सावळो केणी (१० हजार + स्मृतिचिन्ह), रत्नागिरीचे बाळ दाते याना खाऊवाले पाटणकर (१० हजार + स्मृतिचिन्ह) व नाशीकचे रविंद्र अग्निहो‌त्री याना रंगसेवा (१० हजार + स्मृतिचिन्ह) या पुरस्कारानी सन्मानित करण्यात येणार आहे.याच कार्यक्रमात डोंबिवलीच्या कु. प्राजक्ता काकतकर व सांगलीच्या  गायत्री कुलकर्णी याना लक्ष्मीबाई पंडित पुरस्काराने तर पुण्याचे प्रमोद जोशी व आर. आर. कुलकर्णी यांना द. कृ. लेले पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रत्येकी ५ हजार रु. व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे..

विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर म्हणाले, बालगंधर्वांची गायकी म्हणजे महाराष्ट्रातील नाट्यसृष्ट्रतील

चिरकाल आणि शाश्वत असे सुवर्णपान आहे. लहान मुलांच्या कानातील डुल जसे सहजतेने डुलतात आणि ते कोणत्याही अंगाने पाहिले तरी सुंदरच दिसतात तशी बालगंधर्वांची गायकी कोणत्याही अंगाने पाहिली तरी सहज आणि सुंदर दिसायची. बालगंधर्वांनी सदैव सुरांवर प्रेम केले. प्रारंभी बालगंधर्वांना नाटकांत काम करायचेच नव्हते. त्यात स्त्री भूमिका तर नाहीच करायची होती. पंरतू देवल यांनी त्यांना पटवून सांगितले की प्रत्यक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषांत एक स्त्री असते म्हणुनच आपण अर्धनारी नटेश्र्वराची पूजा मांडत असतो. बालगंधर्वांना हे पटले आणि त्यांनी इतिहास घडविला.

बालगंधर्व मंडळाचे अध्यक्ष सुरेशसाखवळकर यांनी प्रास्ताविक केले.  पं. मुकुंद मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच  कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी यांच्यासह कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, कर – सल्लगार विजयकांत कुलकर्णी यांनी देखील यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रंगबहार या नाट्यसंगीताच्या मैफल संपन्न झाली. या मैफलीत राजा काळे, पं. उपेंद्र भट, बकुल पंडित, मुकुंद मराठे, अभिनेत्री गात, अभिषेक काळे, गायत्री कुलकर्णी, रविंद्र कुलकर्णी, प्राजक्ता काकतकर व सुरेश साखवळकर हे कलाकार सह‌भागी झाले होते. त्यांना तबला साथ अभिजित जायदे व केदार कुलकर्णी, आँर्गन साथ संजय गोगटे व बाळ दाते तर व्हायोलीनची साथ  प्रज्ञा देसाई- शेवडे यांनी केली.

बालगंधर्वांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा “बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार” यंदा पं. मुकुंद मराठे याना विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी डाविकडून कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर,मराठे,अभ्यंकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी आणि कर – सल्लगार विजयकांत कुलकर्णी.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles