एलिट किड्स शाळेचा पालखी सोहळा उत्साहात साजरा
पाऊले चालती पंढरीची वाट ।
आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर पर्यंत केलेली पायी वारी.
आधुनिक काळात वर्षानुवर्षे चालत आलेल्या भारतीय संस्कृतीचे महत्व नवीन पीढिला समजावे यासाठी एलिट किड्स नेहमिच प्रयत्नशील असते. ह्याच उद्देशाने शनिवार दिनांक ९ जुलै २०२२ रोजी एलिट किड्स ने पायी वारीचे आयोजन केले. ज्या मध्ये सर्व पालक आणि विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा परिधान करुन सहभागी झाले. पालकांनी आपल्या चिमुकल्या मूलांसोबत पायी वारी, पालखी विसावा, रिंगण, फुगड्या, अभंग याचा आनंद घेतला. पालकांनी भजन, कीर्तन आणि विविध अभंग सादर केले.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत भारतीय संस्कृती, सण समजावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी एलिट किड्स गेली ६ वर्षे काम करत आहे अशी माहिती एलिट किड्स च्या संस्थापिका मुख्याध्यापिका सौ. जागृती अभंग यांनी दिली.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जागृती अभंग, सर्व पालक , विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पालकांनी मोलाचे सहकार्य केले.