Friday, November 8, 2024

जगन्नाथ रथयात्रा पुणे महामहोत्सव जल्लोषात साजरा

जगन्नाथ रथयात्रा पुणे महामहोत्सव जल्लोषात साजरा

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल ६० हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप

पुणे

जगन्नाथ रथयात्रा पुणे : जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा, हरे राम हरे कृष्णा… च्या जयघोषात पुणेकरांनी भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा विराजमान असलेल्या जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.

ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि भव्य स्वागत यामुळे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळा पुण्यात मोठया जल्लोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.

ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा यंदा आषाढ महिन्यात मोठया उत्साहात साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथून आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला.

प.पू. लोकनाथ स्वामी महाराज, प.पू. भक्ती पुरुषोत्तम स्वामी महाराज, प.पू. कृष्णचैतन्य स्वामी महाराज यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन व आरती होऊन रथयात्रेला प्रारंभ झाला.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, इस्कॉन पुणेचे अध्यक्ष राधेश्याम दास, माधव जगताप, प्रशांत वाघमारे, माजी खासदार अमर साबळे, श्रीनाथ भिमाले, कृष्णकुमार गोयल, जयप्रकाश गोयल, किशोर येनपुरे, अशोक गुंदेचा, राजेश मेहता, श्रीप्रकाश बागडी, चरणजीतसिंग, इस्कॉन पुणेचे श्वेतद्विप दास, नटवर दास, रेवतिपती दास यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली. देवतांच्या मूर्तीला कलकत्ता येथून आणलेल्या वस्त्राचा पोशाख तसेच सुवर्णालंकार घालण्यात आले होते.

ल्युमिनस (Luminous) बॅटरीसह इंटेग्रेटेड इन्व्हर्टर ही नव्या युगाची “लि-ऑन (Li-ON)” सिरीज सादर

श्री हनुमानाच्या वेशातील कलाकारासह झेंबे, कर्ताल, मृदंग अशी वाद्ये वाजवित भाविक यात्रेत सहभागी झाले. शंखनाद व ढोल-ताशांचा गजर तसेच पुष्पवृष्टी पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती.

हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविकांनी ओढला. जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर मार्गे हॉटेल सेंट्रल पार्क येथे रथयात्रेचा समारोप झाला. ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यामध्ये अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी झाले.

जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही.

त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची दया जगभर पसरवण्यासाठी  जगन्नाथ रथयात्रा पुणे  सुरू केली. रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या देवतांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते.

रथयात्रेच्या समारोप प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संपूर्ण रथयात्रेदरम्यान तब्बल ६० हजार भाविकांना महाप्रसादाच्या पाकिटांचे वाटप आणि ८ ते १० हजार भक्तांना भोजन देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथून आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला. जगन्नाथ रथयात्रा पुणे तील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविकांनी ओढला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles