Friday, November 8, 2024

*डॉ.शैलेश चौबे यांची प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाच्या अध्यक्षपदी तर लक्ष्मीनारायण पांडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती*

*डॉ.शैलेश चौबे यांची प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाच्या अध्यक्षपदी तर लक्ष्मीनारायण पांडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती*

पुणे :

‘आज प्रधानमंत्री जन कल्याणकारी प्रचार प्रसार अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी पुणे जिल्ह्यातील नियुक्त्या केल्या आहेत. ज्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला सर्वश्रेष्ठ बनविण्यचे ध्येय हाती घेतले आहे. ते पूर्ण होण्यास मदत होईल. या अभियानातील केंद्रीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मत जेम पोर्टल उपक्रमाच्या राष्ट्रीय प्रभारी उषा बाजपेयी यांनी प्रमुख पाहुणे म्हणुन व्यक्त केले.

निमित्त होते पुना क्लब येथे पदनियुक्ती कार्यक्रमाचे.

उषा बाजपेयी (राष्ट्रीय प्रभारी, जेम पोर्टल नोंदणी उपक्रम) आणि देविदास पांडुरंग दामोदरे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) यांच्या हस्ते डॉ. शैलेश धनंजय चौबे यांना अध्यक्ष पद तर लक्ष्मीनारायण पांडे यांना उपाध्यक्ष पद नियुक्ती पत्र प्रदान केले गेले.

उषा बाजपेयी म्हणाल्या, आज भारत देश हा प्रगती पथावर आहे. देशात नवनवीन क्रांती झाली आहे. पंतप्रधानांनी नागरिकांसाठी विविध योजना आणल्या या सर्वयोजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. डॉ. शैलेश चौबे आणि लक्ष्मीनारायण पांड्ये हे या अभियानासाठी उत्तम चालक आहेत. त्यांच्यावर सोपविलेली अभियानाची जबाबदारी ते उत्तमरित्या पार पाडतील, याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देविदास पांडुरंग दामोदरे बोलताना म्हणाले, प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजनेत अनेक योजना सर्वसामान्यांसाठी आहेत. या प्रचार प्रसार अभियानाच्या माध्यमानातून या योजनांची माहिती घरोघरी पोहोचावी यासाठी नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे.

भारताच्या पंतप्रधानांच्या १३७ व्या विशेष कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाची स्थापना करण्यात आली.

या योजना पुणे जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी पुणे जिल्हा अध्यक्षपदी डॉ.शैलेश धनंजय चौबे तर उपाध्यक्ष पुणे जिल्हा पदी लक्ष्मीनारायण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजने अंतर्गत महिला, बेरोजगार तरुणांसाठी विशेष कल्याणकारी योजना, शेतकर्‍यांसाठी आर्थिक मदत, शालेय मुलांसाठी शैक्षणिक मदत, मेक इन इंडिया, स्टार्टअप्सना मदत अशा विविध योजना राबविल्या जातात.

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह राज्यांमध्ये या योजनांसाठी जागरुकता कार्यक्रमांना वेग आला आहे. पुणे जिल्हयातील गती वाढवण्यासाठी वरील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असे उषा बाजपेयी (राष्ट्रीय प्रभारी, जेम पोर्टल नोंदणी उपक्रम) यांनी सांगीतले.

आपल्या नवीन भूमिकेवर भाष्य करताना, डॉ. शैलेश धनंजय चौबे म्हणाले, “प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानासाठी पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. पुणे जिल्ह्यातील वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी मंत्र्यांच्या योजना पुणे जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायती आणि गावांमधील खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पंतप्रधान योजना पोहोचतील याची आम्ही खात्री करू.

जुलै 2022 ते मार्च 2023 या 09 महिन्यांत पुणे जिल्ह्यातील किमान 50000 लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहोचविण्याचे येत्या 2022-23 या वर्षासाठी लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती लक्ष्मीनारायण पांडे यांनी दिली.

सृष्टी कुमार आणि सुनील वंदना सिंग यांनी प्रास्ताविक केले.
———–

*डॉ. शैलेश धनंजय चौबे* हे संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट आहेत. भारत आणि परदेशात उच्च शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शिष्यवृत्ती आणि सतत सहाय्य प्रदान करून इच्छुक विद्यार्थ्यांना मदत करणे हे त्यांचे सातत्याने उदिष्ट असते.

*लक्ष्मीनारायण पांडे* हे पीक उत्पादन वाढवण्यात प्रख्यात कृषी तज्ञ आहेत. तसेच गेल्या 25 वर्षांपासून ते कृषी क्षेत्राशी संबंधित भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संबंधित आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles