Thursday, July 31, 2025
HomeMarathi newsहॅन्डलूम प्रदर्शन पुणेकरांसाठी ३ जुलैपर्यंत खुले* - विणकर, हातमाग व्यावसायिकांना प्रोत्साहनासाठी...

हॅन्डलूम प्रदर्शन पुणेकरांसाठी ३ जुलैपर्यंत खुले* – विणकर, हातमाग व्यावसायिकांना प्रोत्साहनासाठी इंडियन सिल्क गॅलरीचा पुढाकार

*हॅन्डलूम प्रदर्शन पुणेकरांसाठी ३ जुलैपर्यंत खुले*

– विणकर, हातमाग व्यावसायिकांना प्रोत्साहनासाठी इंडियन सिल्क गॅलरीचा पुढाकार

पुणे : ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्याना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे पुण्यात पहिल्यांदाच भव्य हातमाग प्रदर्शनाचे (बिगेस्ट हॅन्डलूम एक्झिबिशन) आयोजन केले आहे. येत्या ३ जुलै २०२२ पर्यंत सकाळी ११ ते ८ या वेळेत सिद्धी बँक्वेट, डीपी रस्ता, पुणे येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.

हातमाग विकास आयुक्तालय, इंडिया हॅन्डलूम, हॅन्डलूम मार्क यांच्या सहकार्याने एकाच छताखाली हे प्रदर्शन होत आहे. महाराष्ट्रासह अन्य १४ राज्यांतील ६० पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक (नि.) श्रीनिवास राव, सीईओ विनयकुमार व अनघा घैसास यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

श्रीनिवास राव म्हणाले, “देशभरातील विणकरांची कलाकुसर प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडताना आम्हाला आनंद होत आहे. महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे हे प्रदर्शन आहे. कुशल कारागिरांच्या हाताने विणलेल्या कपड्यावर सुंदर आणि मोहक नक्षीदार काम झाले आहे. रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते. त्याचा गैरफायदा घेत काही उत्पादक आणि व्यापारी बाजारात बनावट कपड्यांची विक्री करतात. हे टाळून ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल्स व अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहेत.”

“ग्राहकांना सिल्क कपड्याबाबत जागरूक करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. यामध्ये देशाच्या विविध भागात असलेली विशेषता हातमाग, कॉटन, सिल्क, लिनन या कपड्यांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर कलाकुसर, नक्षी आणि गुणवत्तापूर्ण कपडे उपलब्ध आहेत. महिलांसाठी ही एक अनोखी पर्वणी आहे. आगामी काळातील सण-उत्सव, लग्न समारंभासाठीच्या साड्या असे अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. स्वतः कापड विणून विणकामाचा अनुभव घेण्याची संधीही येथे उपलब्ध करून दिली आहे,” असे श्रीनिवास राव म्हणाले.

पश्चिम बंगालच्या बुटीक साड्या, प्रिंटेड, चंदेरी, पैठणी, माहेश्वरी, बनारसी, गढवाल, कलमकरी, कांचीपुरम, करवथी अशा विविध राज्यांची ओळख असलेल्या असंख्य साड्या येथे पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश अशा विविध भागांतून साड्या, ड्रेस मटेरियल्स व अन्य साहित्याचे स्टॉल लागले आहेत. अधिकाधिक पुणेकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच विणकरांना प्रोत्साहित करावे, अनघा घैसास यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Access Denied

Access Denied

Access Denied

Access Denied

Recent Comments