*स्टेशन मार्स्टसकडून ३०० फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन*
पुणे, प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या आझादी महोत्सवानिमित्त ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशन पुणे यांच्या तर्फे मंगळवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डीआरएम कार्यालय यादरम्यान ३०० फूट तिरंगा घेऊन पदयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन ‘भारत माता की जय’ घोषणा देत पदयात्रा पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक मार्ग डीआरएम ऑफीस याठिकाणी पोहचली. पुणे रेले प्रबंधक रेणु शर्म यांनी सदर यात्रेचे डीआरएम कार्यालयात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी अति. मंडल रेल प्रबंधक ब्रिजेश कुमार आणि प्रकाश उपाध्याय, वरीष्ठ मंडल यातायात प्रबंधक डॉ.स्वप्नील नीला, मंडल संरक्षण अधिकारी देवेंद्र कुमार, बंडगर्डन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्वीनी सातपुते, आस्माचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, पुणे मंडल अध्यक्ष गंगाधर शाहू, सचिव कृष्णप्रसाद मुरारी, सेंट्रल रेल्वे झोनल सचिव एस.के.मिश्रा, झोनल वर्किंग अध्यक्ष अजय सिन्हा, ट्रॉफिक इन्सपेक्टर प्लॅनिंग किरण होजगे, पुणे मंडल वित्त सचिव अमितकुमार, विश्वजीत र्कीतीकर, शकील इनामदार , दिनेश कांबळे तसेच आस्मा मुंबई मंडल वित्त सचिव जे.पी.यादव उपस्थित होते.
रेल प्रबंधक रेणु शर्मा म्हणाल्या,स्वातंत्र्याच्या आझादी महोत्सवचे सरकारी अधिकृत कार्यक्रम होतात परंतु स्टेशन मार्स्टस यांनी पुढाकार घेत ही पदयात्रा काढली ती अभिमानस्पद आाहे. स्टेशन मार्स्टस महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि संवेदनशील प्रकारे काम करत असतात त्यामुळे रेल्वेसेवा सुरळीत राहू शकते. देशाच्या सन्मानाचा कार्यक्रम घेणे ही महत्वपूर्ण बाब आहे.
आस्माचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे म्हणाले, भारताच्या स्वतांत्र्याच्या आझादी महोत्सवाच्या अनुषंगाने रेल्वे स्टेशन मार्स्ट्रस असोसिएशनच्या माध्यमातून ३०० फूटी तिरंग्याची रॅली काढण्यात आली. १५ ऑगस्ट पर्यंत अनेक शासकीय कार्यक्रम होते तसेच स्टेशन मार्स्टस शासकीय कर्मचारी असल्याने ते व्यस्त होते. त्यामुळे १६ ऑगस्ट रोजी आम्ही तिरंगा पदयात्रा रॅलीचे आयोजन केले. स्टेशन मार्स्टस परिवाराने देशाप्रती आपली भावना व्यक्त करण्यासाठी सहपरिवार एकत्रित आले.