*सिंधू सेवा दलातर्फे गुरुवारी ‘चेटीचंड’ महोत्सव*
पुणे : सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७३ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (दि. २३ मार्च) हा महोत्सव अल्पबचत भवन, क्वीन्स गार्डन रोड, रेसिडेन्सी क्लबजवळ, कौन्सिल हॉल, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सिंधू सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी व दीपक वाधवानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार राजेंद्र फेरवानी, सहखजिनदार निलेश फेरवानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला आदी उपस्थित होते.
अशोक वासवानी म्हणाले, “चेटीचंड महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होईल. मुंबईतील रॉकस्टार गायक नील तलरेजा यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि इंदोर येथील लोकप्रिय सिंधी गायक निशा चेलानी सादरीकरण करणार आहे. सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानी कार्यक्रम संचालित करणार आहे. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर प्रीतिभोजने (महाप्रसाद) महोत्सवाची सांगता होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील चार हजार अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी होतील.”
“या कार्यक्रमात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन वालेचा, बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सह अधिष्ठाता डॉ. भारती दासवानी यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधू सेवा दल गेली ३३ वर्ष कार्यरत आहे,” असे सुरेश जेठवानी यांनी नमूद केले.
—————————-
पत्रकार परिषदेत डावीकडून निलेश फेरवानी, सचिन तलरेजा, सुरेश जेठवानी, अशोक वासवानी, देवेंद्र चावला, राजेंद्र फेरवानी व दीपक वाधवानी.