*श्री. नरसिंह सरस्वती मेडिकल फौउंडेशनचे इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी येथे अक्सिलेटर मशिनचे लोकार्पण*
पुणे : श्री. नरसिंह सरस्वती मेडिकल फौउंडेशनचे इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी येथे कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन अक्सिलेटर मशीन बसवण्यात आले. आज या मशिनचे लोकार्पण बजाज फिंसर्व सीएसआरच्या चेअरमन शेफाली बजाज यांच्या हस्ते कऱण्यात आले. अशी माहिती इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्युट, आळंदीचे मुख्य विश्वस्त व प्रमुख कॅन्सर सर्जन तसेच रुबी हॉल क्लीनिक, कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मशिनच्या लोकार्पण प्रसंगी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, बजाज फिंसर्व सीएसआरचे हेड अजय साठे, डॉ. संजय देशमुख, डॉ. मुकुंद देशपांडे ( सचिव / ट्रस्टी, श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशन), डॉ. सोनाली देशमुख, डॉ. चारूशिला देशपांडे, अनिल पत्की, डॉ. भुषण झाडे, ब्रिगेडियर डॉ. राजीव जोशी, डॉ. मंजिरी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी हॉस्पिटलची वाटचाल दाखविणाऱ्या माहितीपटाचे अनावरण शेफाली बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. संजय देशमुख म्हणाले, श्री. नरसिंह सरस्वती मेडिकल फौउंडेशनचे इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी येथे हे धर्मदाय हॉस्पिटल आहे. येथे कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. कॅन्सर पेशंटवर उपचारांसाठी २०१२ साली येथे प्रथम येथे लिनियर अक्सीलेटर मशीन बसवण्यात आले. पहिल्या वर्षी ३०० , मागील वर्षी १३ हजार तर यंदाच्या वर्षी १ हजार दोनशे ७१ पेशंट वर या मशिनच्या माध्यमातून उपचार केले गेले. आज बसविण्यात आलेले हे तिसरे अक्सीलेटर मशीन आहे. या अत्याधूनिक मशिनच्या खरेदीसाठी बजाज फिंसर्व कंपनीने अर्थसहाय्य केले आहे. या मशिनाच्या माध्यमातून कॅन्सर पेशंटवर रेडिएशन थेरपी कऱण्यात येते. आमच्याकडे जवळपास ९० टक्के शस्त्रक्रिया या मोफत केल्या जातात. तसेच येथे केमो थेरपी, लहान मुलांवरील कॅन्सरचे उपचार हे देखील मोफत केले जातात. मागील वर्षी या सेंटरमध्ये जवळपास १३ हजार कॅन्सर पेशंटवर मोफत उपचार करण्यात आल्याचे डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.
तसेच हाॅस्पिटल मध्ये नुकताच एक पेडिएॅट्रिक म्हणजे लहान मुलांचा कर्करोग विभाग सुरू करण्यात आला आहे व मार्च अखेर एंडोस्कोपी विभाग सुरू होणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.