*रस्ते वाहतूक सुरक्षा जागृतीसाठी टीव्हीएस युरोग्रीपतर्फे बाईक रॅली*
पुणे : हेल्मेट वापरा, वेगाची मर्यादा, वाहतुकीचे नियम पाळा, सहप्रवाशांचा आदर करा, असा नारा देत भूगाव येथील रॉयल लेक बँक्वेट्स ते लवासा सिटी अशी बाईक रॅली निघाली. रस्ते वाहतूक सुरक्षा जागृतीसाठी टीव्हीएस युरोग्रीपतर्फे ‘ब्रंच अँड बाइकिंग’ या बाईक रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये १२५-१५० बाईक रायडर्सनी सहभाग घेतला.
परस्परांत सामाजिक बंध निर्माण व्हावा, बाईक रायडिंगचा सामूहिक आनंद घेता यावा, त्यातून वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती करावी, हा या उपक्रमाच्या आयोजनामागील उद्देश होता. देशभरातील हौशी बाइक रायडर्स उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. महिलांचाही लक्षवेधी सहभाग होता. ‘ब्रंच अँड बाइकिंग’ उपक्रमाची चौथी आवृत्ती पुण्यात पार पडली.
टीव्हीएस युरोग्रीपचे ट्रेड मार्केटिंग हेड के. कार्तिक यांच्या हस्ते ध्वज दाखवत रॅलीला प्रारंभ झाला. प्रसंगी कुणाल नागपाल, शैलेश गिडिया, राकेश मुथियन, बेरार्ड मस्कारेन्हास आदी उपस्थित होते. यापूर्वी भुवनेश्वर, बंगलोर, चेन्नई येथे हा उपक्रम झाला. रायडर्सच्या सुरक्षेसाठी रॅलीमध्ये मोटारबाइक मेकॅनिक, ऍम्ब्युलन्स, डॉक्टर आणि स्वयंसेवक उपलब्ध होते.
बाइक रायडर स्मिता म्हणाल्या, “गेल्या १० वर्षांपासून बाईक रायडींग करत आहे. माझ्या पतीने प्रोत्साहन दिले. हा अनुभव अतिशय आनंद देणारा आणि अनुभवसंपन्न करणारा आहे. रस्ते सुरक्षा जागृतीसाठी ही रॅली समाजासाठी उपयुक्त ठरेल. प्रत्येकाने सुरक्षित जीवनासाठी वाहतुकीचे नियम पाळायला हवेत.”
——————-
“पुणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या बाइकर्सना पाहून आनंद वाटतोय. एकत्रितपणे रस्ते सुरक्षेचा संदेश देत ही रॅली ४५ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. देशभरातील विविध शहरात ‘ब्रंच अँड बाइकिंग’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे उत्साही, साहसी तरुण-तरुणी एकत्रित रायडिंगचा अनुभव घेऊ शकतील.”
– के. कार्तिक, प्रमुख, ट्रेड मार्केटिंग, टीव्हीएस युरोग्रीप