रविवार दिनांक 5 मार्च 2023 सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत रिसर्च पार्क फाउंडेशन यांच्या वतीने प्रकर्ष एम. एस. एम. ई. अँड वूमन इंटरप्रीनर्स कॉन्क्लेव परिषदे आयोजन
रविवार दिनांक 5 मार्च 2023 सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत रिसर्च पार्क फाउंडेशन यांच्या वतीने प्रकर्ष एम. एस. एम. ई. अँड वूमन इंटरप्रीनर्स कॉन्क्लेव परिषदे आयोजन करण्यात आले आहे याची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली
‘प्रकर्ष’ आयोजित पुनीत बालन ग्रुप च्या वतीने एम. एस. एम. ई. अँड वूमन इंटरप्रीनर्स कॉन्क्लेव चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भविष्यकाळातील ‘आर्टिफिशियल इंटेलिजंट ‘ या पुस्तकाचे विमोचन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय नामदार श्री उदयजी सावंत ह्याच्या हस्ते होणार आहे . आणि महिला व पुरुष उद्योजकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ही माहिती आज घेण्यात अलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. शालीग्राम यांनी दिली.
यावेळी सुचित्रा चाटर्जी संस्थापक IWNO. डॉ. संजय गांधी संस्थापक aspire नॉलेज अँड स्कील, वासंती मुळजकर संस्थापक व्ही 3 एम टेक्नोलॉजी, आणि संजू उन्नी सीईओ ब्रेनक्स आणि मनोज यनपुरकर हे पत्रकार परिषदे साठी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत रिसर्च पार्क फाउंडेशनची आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापना केली आहे . यात नवउद्योजकांना (स्टार्टअप) व उद्योजकांना मार्गदर्शन , वित्तीय सहाय्य तसेच येणाऱ्या काळातील इंडस्ट्री 4.O च्या सुविधा दिल्या जातात . याची माहिती व प्रसार व्हावा यासाठी रविवार 5 मार्च 2023 रोजी एक दिवसिया ‘प्रकर्ष’ एम. एस. एम. ई. अँड वूमन इंटरप्रीनर्स कॉन्क्लेव चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांमध्ये उद्योग जगतामध्ये ज्यांनी उत्तुंग यश मिळवले अश्या उद्योजकांचे मार्गदर्शन , संवाद , परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . उद्योजकांना विविध विषयावर मार्गदर्शन करणारे वर्ग ज्यात इंटरप्रीनर स्टेटजी टू सस्टेंड अँड स्केल टू सक्सेस तसेच व्हॅल्यू क्रिएशन फॉर बिजनेस या विषयाची माहिती देण्यात येणार आहे. भविष्यकाळातील ‘आर्टिफिशियल इंटेलिजंट ‘ या पुस्तकाचे विमोचन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय नामदार श्री उदयजी सावंत ह्याच्या हस्ते होणार आहे . महिला व पुरुष उद्योजकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.