मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन
मुस्लिम आरक्षणाचा विषय गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे, मुस्लिम समाज हा ८० टक्के मागासलेला आहे, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण ही काळाची गरज आहे,ही गरज ओळखून २०१४ साली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार असताना राणे समिती नेमुन मराठा समाजाला १६% व मुस्लिम समाजाला ५% आरक्षण देण्यासंदर्भात,सरकारने अध्यादेश काढला,भारतीय जनता पार्टीने त्याला विरोध केला व सदर प्रकरण कोर्टात गेले, मा,हायकोर्टाने आदेश दिले की मुस्लिमांना शिक्षणामध्ये ५% आरक्षण मिळायला हवे असे मा,हायकोर्टाने दिले आहेत, ऑक्टोंबर २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले,पाच वर्ष मुस्लिम आरक्षणावर कुठलीही कार्यवाही झाली नाही,मुस्लिम समाजाने हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला आहे,मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढले आंदोलन केली,पण राज्य सरकार मुस्लिम समाजाला दुर्लक्ष करत आहे,१९ डिसेंबर ते ३० डिसेंबर महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे,सरकार दरबारी आमच्या मागण्या पोहोचाव्या या उद्देशाने, शुक्रवार २३ डिसेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता कलेक्टर ऑफिस पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर,अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात आले,
तरी राज्य सरकारने त्वरित मुस्लिम आरक्षण लागू करावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जण आंदोलन उभं करू असा इशारा देण्यात आला
सदर आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष,समीर अन्सार शेख,यांनी केले होते, प्रशांत जगताप,अरविंद शिंदे,प्रदीप देशमुख, मुफ्ती शाहिद,अंजुम इनामदार,फैयाज खान,राहुल डंबाळे, उस्मान तांबोळी,मुस्ताक शेख,कारी इद्रिस, व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते,