Friday, November 8, 2024

*”मिलेनियम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (मिकी) ची व्यापारी बैठक जुलै 2022 संपन्न”*

*”मिलेनियम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (मिकी) ची व्यापारी बैठक जुलै 2022 संपन्न”*

मिलेनियम चेंबरची बिझनेस मीटिंग जुलै 2022 व्हीआयपी गेस्ट हाऊस, पुणे येथे संपन्न झाली या प्रसंगी प्रमुख उद्योगपती उपस्थित होते. मिलेनियम चेंबर आणि मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या INVENTION, INNOVATION, INCUBATION या प्रकल्पाच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रशिक्षण भाग-भांडवल आणि उत्पादनाचे विपणन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख डॉ. प्रा. के आर. पाटील उपस्थित होते. श्री डॉक्टर पाटील यांनी त्यांच्या संस्थे बरोबर मिककी चे ही उद्दिष्ट सांगितले. स्टार्टअप करिता अनुकूल व पूरक अशा सर्व सुविधा मिककीकडे उपलब्ध आहेत तसेच देशी व विदेशी Funds हे गुंतवणुकी करिता तयार आहेत, अशा पन्नास हून अधिक start-up आमच्याकडे आहेत त्यांच्या नवकल्पना मूर्ती रूप देण्याचे त्यांना उद्योग उभारण्याचे कार्य आम्ही हाती घेतले आहे असे मिलेनियम चेंबरचे अध्यक्ष श्री शशिकांत घोडे म्हणाले. त्याच प्रमाणे मिलेनियम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (मिकी) आणि एमसीआयआयआय चे उद्दिष्ट समान असल्याचे सांगितले.
आपल्या देशात कधी नव्हे इतके पोषक वातावरण उद्योग उभारण्याकरिता स्टार्टअप करिता उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षात 1 Trillion इकॉनोमी नंतर सात वर्षात दोन Trillion आणि 2030 पर्यंत 5 Trillion पर्यंत मजल आपण मांडणार आहोत, तेव्हा एकतृतीयांश जनसंख्या उच्चमध्यमवर्गीय झालेली असेल. अश्या व्यापारी बाजारपेठेत भारतीय मेक इन इंडिया उत्पादन जगभरात जाईल वव नवउद्योजक निर्माण करण्याची आपली उद्दिष्टे देशाच्या जीडीपीमध्ये निश्चित आणि भरीव योगदान देईल याची खात्री वाटते असे नमूद केले.
*लवकरच एमसीआयआयआय आणि मिक्की यांच्यामध्ये सहकार्य करार करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी मिकी चे सभासद आणि एमसीआयआयआय यांच्यामध्ये एक करोड पंच्याहत्तर लाख रुपयांच्या निधी वाटपाची स्वाक्षरी झाली,* त्यानंतर *डॉ. तुकाराम आवळे यांनी मिकी चे ब्रीदवाक्य Healthy, Wealthy And Intelligent Society कशी निर्माण करता येईल आणी आपण सुदृढ कसे राहू शकतो, आहारातील कुठल्या सामग्री आपण सोडून कसे राहावे याचे प्रात्यक्षिक दाखवले, सशक्त राहण्याकरता कोणता आहार घ्यावा आणि काय खाणे टाळावे याचे वैद्यकीय दाखले देऊन विस्तृत विवरण केले. विजय अक्कावर यांनी Franchisee मॉडेल मधून व्यापाराची संधी कशी उपलब्ध आहे याचे विवेचन केले.*
सदर कार्यक्रमांमध्ये यशस्वी उद्योजक पुरस्कार जाहीर झाले या कार्यक्रमात विलास साळवी-सचिव पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याच प्रमाणे डॉक्टर चंद्रशेखर तलाठी श्री सुहास लुंकड यांचाही मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, या प्रसंगी श्री बीए आदमाने (संस्थापक सोली पूनावाला प्रशाला), महेंद्र तूप सुंदर (प्रो.प्रा. globac epc pvt. ltd), राजेंद्र दनके (संस्थापक, संपादक दैनिक लोकटाईम्स, वसंत अवघडे (सीनियर डायरेक्टर c-dac), सलिल झवेरी (ब्रँड अँबेसिडर, अंबरनाथ नगरपालिका) डॉ. राजु घोडे (डायरेक्टर सिंबायोसिस इन्स्टिट्यूट), प्रकाशक अबनावे (सहसचिव-जलसंपदा मंत्रालय), पुंडलिक थोटवे (अधीक्षक अभियंता जलसंधारण महाराष्ट्र राज्य), नंदकुमार सपकाळ (कार्यकारी अभियंता मुंबई एअरपोर्ट ट्रस्ट), रामदास साळवे (प्रोप्रा साळवे गार्डन), बाळासाहेब भांडे (जिल्हा सचिव शिवसेना), ऍडव्होकेट राजेंद्र शिंदे, संदीप सांगळे (उपाध्यक्ष भाजपा पुणे शहर), नागेश (अध्यक्ष रेवन सिद्धी सहकारी संस्था सोलापूर) असे अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सौ प्रियंका शिवेकर यांनी तर डॉक्टर वैशाली थोरात यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles