*महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर*
*यांचा विजय निश्चितच*
– *आमदार, संग्राम थोपटे*
*श्री तांबडी जोगेश्वरी देवीच्या आर्शिवादाने प्रचाराचा शुभारंभ !*
पुणे : महाविकास आघाडीचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, समविचारी पक्ष-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र हेमराज धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी देवीला खण, नारळाची ओटी भरुन गुरुवारी करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे निरीक्षक व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रशांत जगताप, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे, माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी राज्य मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार रमेश बागवे, माजी आमदार महादेव बाबर, माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, काँग्रेसचे डॉ.रोहित टिळक, माजी महापौर कमलताई व्यवहारे व रजनी त्रिभुवन, माजी उपमहापौर आबा बागुल व दीपक मानकर, लता राजगुरू, रफीक शेख, पल्लवी जावळे, दत्ता सागरे, संजय बालगुडे, विरेंद्र किराड, प्रशांत बधे, प्रवीण करपे, गणेश नलवडे, संदीप गायकवाड, बाळासाहेब मारणे, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
215 कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक 2023 चे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र हेमराज धंगेकर यांच्या प्रचाराला गुरुवारी ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. यावेळी ग्रामदेवता जोगेश्वरी देवीला खण-नारळाची ओटी भरुन रविंद्र धंगेकर यांनी देवीचा आशिर्वाद घेतले. यावेळी महिलांनी धंगेकर यांचे औक्षण केले. “विजय कोणाचा महाविकास आघाडीचा”,” कसब्यात आवाज कोणाचा महाविकास आघाडीचा”, “आला रे आला पंजा आला” या घोषणांनी परिसर दूमदूमून गेला. फटाक्याची आतषबाजी…बँडपथकाच्या निनाद व रविंद्र धंगेकर यांचा विजय असो, अशा घोषणा हजारो कार्यकर्ते व नागरिकांनी देऊन त्यांना उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.
श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून सुरु झालेल्या फेरीमध्ये नागरिकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. मेहुणपुरा येथील सोसायट्यामध्ये महिलांनी रविंद्र धंगेकर यांचे औक्षण केले. तसेच अनेकांनी पुष्पवृष्टी करुन ‘भाऊ, विजय तुमचाच’ असल्याचा विश्वास त्यांनी दिला. त्याचबरोबर ज्येष्ठांनी धंगेकर यांना आर्शिवाद देत आम्ही तुमच्या व कसब्याचा विकासासाठी तुमचाच विजय निश्चित असल्याचे यावेळी सांगितले. अप्पा बळवंत चौक, मेहुणपुरा रस्ता, अहिल्याबाई चौक, शिंदेपार चौकासह ठिकठिकाणी रविंद्र धंगेकर यांचे स्वागत व महिलांनी औक्षण व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांना पाणी शरबतदेखील वाटप करुन मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले. फेरीमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. प्रत्येकाच्या हातात तिरंगी ध्वज, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच समविचारी संघटनेचे व सर्व आघाडीचे ध्वज हाती होते. ‘सदैव आपला धंगेकर’, अशा विविध फलक नागरिकांनी हाती घेत शुभ यात्रेच्या पदयात्रेत सहभाग नोंदवला.
अहिल्याबाई होळकर चौक, गणेश मंडळ, श्री मारुती शनी मंदिर, शनिवारपेठ मेहूनपुरा गणेश मंडळा च्या श्रीचें दर्शन घेतले. तसेच मंडळीने स्वागत केले. प्रचार फेरी श्री तांबडी जोगेश्वरी पासून अप्पा बळवंत चौक मार्गे मेहुणपुरा- शनिवार पेठ, अहिल्याबाई होळकर चौक, रामशास्त्री प्रभुणे चौक, शिंदेपार चौक, रमणबाग चौक ते केसरीवाडा येथे फेरीचा समारोप झाला. प्रसंगी मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती व लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘महाविकास आघाडीचा विजय असो’, असे घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी कॉंग्रेस पक्षाचे आमदार व निरीक्षिक संग्राम थोपटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महाविकास आघाडीचा मोठा पाठींबा व नागरिकांचा प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना आहे. त्यामुळे आमची विजयाची घौडदौड सुरु झाली आहे. आजपर्यंत भाजपाने नागरिकांची फसवूणकच केली आहे. आता त्यांच्या फसवणूकीला नागरिक बळी पडणार नाही. नागरिकांचे मत विकास करणार्या महाविकास आघाडीलाच असणार असल्यामुळे धंगेकर यांचा विजय निश्चित आहे.
महाविकास आघाडीचा विजय निश्तिच आहे. नागरिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या नाकर्तेपणाला नागरिक कंटाळले आहेत. नागरिकांना आता मतदारसंघाचा विकास हवा आहे. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने बरोबर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित होणार आहे. कसब्यामध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असून निकालाच्या दिवशी याची प्रचीती येईल असे, रविंद्र धंगेकर म्हणाले. कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावणारी ही पदयात्रा केसरीवाडा येथे पूर्ण झाली.
पुण्याची कसब्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी हिच्या चरणी कॉंग्रेस/मविआ कार्यकर्त्यांसह नारळ वाढविताना (डावीकडून) मोहन जोशी, अॅड.अंकुश काकडे, गजानन थरकुडे, प्रशांत जगताप, प्रशांत बधे.
. महाविकास आघाडी कसबा विधानसभा पोटनिवडणूक २०२३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, समविचारी पक्ष-महाविकास आघाडी यांचेअधिकृत उमेदवार धंगेकर रविंद्र हेमराज यांच्या प्रचार रॅली शुभारंभाच्या प्रसंगी मविआचे कार्यकर्ते जल्लोषात करताना.
. पुण्यनगरीचा मानाचा पाचवा केसरी वाडा येथील गणरायाचे महाविकास आघाडी कसबा विधानसभा पोटनिवडणूक २०२३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, समविचारी पक्ष-महाविकास आघाडी यांचे अधिकृत उमेदवार धंगेकर रविंद्र हेमराज यांच्यासह दर्शन घेताना (डावीकडून) कॉंग्रेसचे रोहित टिळक, रमेश बागवे, बाळासाहेब मारणे, संजय मोरे, प्रशांत बधे, दीपक मानकर, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, दीप्ती चवधरी, लता राजगुरू, पल्लवी जावळे आणि कार्यकर्ते.
. पुण्यातील कसबापेठ येथील ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी हिच्या चरणी लीन होऊन दर्शन घेताना महाविकास आघाडी कसबा विधानसभा पोटनिवडणूक २०२३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, समविचारी पक्ष-महाविकास आघाडी यांचे अधिकृत उमेदवार धंगेकर रविंद्र हेमराज यांसह (डावीकडून) मोहन जोशी, रमेश बागवे, रशीद शेख, प्रशांत बधे, दीप्ती चवधरी आणि महिलावर्ग आणि कार्यकर्ते