*दीन,दुबळे ,कष्टकरी व वंचित उपेक्षितांना साईबाबांच्या दर्शनाने उर्जा मिळते* – *पद्मश्री गिरीश प्रभुणे*
– साई मंदिर वडमुखवाडी आळंदी रोड रौप्यमहोत्सव साजरा –
पुणे दि —— शेतकरी ,कष्टकरी ,दीन दुबळे कष्टकरी वंचित ,उपेक्षित माणसाला साईबाबा यांच्या दर्शनाने व प्रेरणेने एक उर्जा मिळत असते असे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी श्री साई मंदिर वडमुखवाडी आळंदी रोड ला २५ वर्षे पुर्ण झाल्यानिम्मित आयोजित रौप्यमहोत्स्ववी महाआरती व महाप्रसाद समारंभ प्रसंगी आपले मत व्यक्त केले
पुढे ते म्हणाले की, शिर्डी ,पंढरपूर ,तुळजापूर या तीर्थस्थानी प्रचंड गर्दी असते त्यामुळे शेतकरी ,कस्टकरी यांना प्रतेक वेळी तिकडे जाणे शक्य नाही त्यामुळे अशा सर्वांसाठी या मंदिरातून आशीर्वाद आणि समाधान मिळत असते .त्यामुळे या साई मंदीरास २५ वर्षे पूर्ण होत आहेत याचा समाजासाठी अतिशय आंनद आणि समाधानाची बाब आहे . याबद्दल या संस्थानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांचे कौतुक केले पाहिजे असे ते म्हणाले .
श्री साई सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी यावेळी मंदिर समितीचे कार्य सांगितले .रक्तदान शिबिरे ,आरोग्य सेवा ,पालखी वेळी वारकऱ्यांना विविध सेवा सुविधा पुरवणे ,सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा व गरीब जोडप्यांना आर्थिक मदत असे विवध उपक्रमाची माहिती त्यांनी सांगितली .
रौप्यम्होत्सवी वर्षानिमित आज साई मंदिरात विशेष महाआरतीचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .या समारंभास पद्मश्री गिरीश प्रभुणे ,खासदार श्रीरंग आप्पा बारणे ,श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे ,विस्वस्त शिवकुमार नेलगे ,युवराज काकडे तसेच भाविक मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते .