Friday, November 8, 2024

*दिवंगत पत्रकार हत्याकांड प्रकरणी पुण्यात पत्रकारांची निदर्शने*

*दिवंगत पत्रकार हत्याकांड प्रकरणी पुण्यात पत्रकारांची निदर्शने*

– *गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन – संघटनांचा इशारा*

पुणे- दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी पुणे शहरात बालगंधर्व चौकात पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बालगंधर्व चौकातील आंदोलनात निषेधच्या घोषणा देण्यात आल्या, तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी आग्रही भूमिका घेण्यात आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आरोपींवर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
याप्रसंगी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश संघटक अनिल मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे शहराध्यक्ष समीर देसाई, संपर्क प्रमुख सागर बोदगिरे, विशाल भालेराव,अमित कुचेकर, मोहित शिंदे, दिपक पाटील,नरेंद्र पारखे, गणेश कदम,सागर काळे,विवेक तायडे,प्रशांत निकम,हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामगुडे, पत्रकार संरक्षण समितीचे अनिल चौधरी, युवा पत्रकार संघाचे प्रकाश यादव, शरद पुजारी यांच्यासह पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

या आंदोलन प्रसंगी आंदोलकांनी दिवंगत पत्रकार शशिकांत वारसे यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच घोषणा देऊन कारवाईची मागणी केली मागण्यांमध्ये प्रामुख्याने या हत्याकांडामागचे प्रमुख सूत्रधार शोधून काढावेत पत्रकार वारीसे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचा निधी द्यावा हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, पत्रकार संरक्षण कायदा सक्षमपणे अंमलबजावणी व्हावी या खटल्यात ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती शासनाने करावी या मागण्या करण्यात आल्या तसेच या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी प्रदेश संघटक अनिल मोरे यांनी दिली
पत्रकारांवर वारंवार हल्ले केले जातात व पत्रकार संरक्षण कायदा सक्षमतेने अंमलबजावणी केली जात नाही आगामी काळात अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली नाही तर पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष समीर देसाई यांनी दिला.
ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना रोख स्वरूपात निधी मदत म्हणून देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles