‘जीएचआर करिअर कनेक्ट’चे सोमवारी (ता. १९) आयोजन
डॉ. वैभव हेंद्रे यांची माहिती; जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचा पुढाकार
पुणे, ता. १५ : वाघोली येथील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या वतीने येत्या सोमवारी (ता. १९) सायंकाळी ६.०० वाजता पुणे कॅम्पमधील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलमध्ये ‘जीएचआर करिअर कनेक्ट’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयचे उपसंचालक डॉ. वैभव हेंद्रे व उपसंचालक डॉ. नागनाथ हुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. नितीन कोरडे, प्रा. वंदना दुरेजा व प्रा. प्रवीण जांगडे उपस्थित होते.
डॉ. वैभव हेंद्रे म्हणाले, “बारावी विज्ञान शाखेतील उत्तीर्ण आणि नव्याने अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे करिअर मार्गदर्शन सत्र अतिशय उपयुक्त असणार आहे. जीएचआर करिअर कनेक्ट अंतर्गत ‘स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे’ हा उपक्रम राबवित आहोत. विद्यार्थ्यांना करिअरची दिशा मिळावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटतर्फे सातत्याने नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतले जातात.”
डॉ. नागनाथ हुले म्हणाले, “या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इनोव्हेशन सेंटरचे प्रमुख प्रा. डॉ. अरविंद शाळीग्राम, टेक महिंद्राचे ऑटोमेशन प्रमुख तुषार सांखे, प्रेरक वक्त्या अपराजिता भूषण, करिअर समुपदेशक केदार टाकळकर, रायसोनी कॉलेजचे कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर मार्गदर्शन करणार आहेत. ‘रायसोनी’चे अध्यक्ष सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी, ग्लोबल एज्युकेशनचे संचालक आदित्य भंडारी यांच्यासह महाविद्यालयाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.”