*जयपूर येथे श्री कल्पतरू संस्थानतर्फे* *जीवराज चोले यांना ‘वृक्षमित्र सन्मान’*

0
165

*जयपूर येथे श्री कल्पतरू संस्थानतर्फे*
*जीवराज चोले यांना ‘वृक्षमित्र सन्मान’*

पुणे : श्री कल्पतरू संस्थानतर्फे जयपूर येथे नुकत्याच झालेल्या वृक्ष मित्र संमेलनात पुण्यातील पर्यावरणप्रेमी पत्रकार, उचित माध्यमचे प्रमुख जीवराज चोले यांना ‘वृक्ष मित्र सन्मान’ प्रदान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष, तसेच उचित माध्यम व पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान दिल्याबद्दल चोले यांना सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

राजस्थान कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला. हिमाचल प्रदेशातील पद्मश्री विद्यानंद सरेक, राजस्थान येथील शेतकरी रोडूलाल जाट, उमा व्यास, प्रमिला स्वामी, पुण्यातील रघुनाथ ढोले, पिंपरीतील भास्कर रिकामे आदींच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवा प्रमुख विजय पुराणिक, वॅन्डरलॅन्डे इंडियाचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक मार्टिन मासलँड, डेटा अनॅलिटीक्स प्रमुख रश्मी चेथन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूलचंद सोनी, श्री कल्पतरु संस्थानचे संस्थापक व ट्री-मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा आदी उपस्थित होते.

विविध वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम, कल्पतरू संस्थेच्या वृक्षारोपण अभियान, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या आशीर्वाद वृक्ष योजनेत जीवराज चोले यांचा सक्रिय सहभाग असतो. प्रत्येकाने दरवर्षी किमान एकतरी झाड लावावे आणि जगवावे, असे आवाहन चोले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here