ग्रेस लेडीज ग्लोबल संघटना, सिंगापूर /यु. एस. ए . आणि रिता इंडिया फाऊंडेशन, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेस्टिव्ह इव्हेंट २०२२ चे आयोजन
डॉ . कलमाडी शामराव हायस्कूल, कन्नड माध्यम , एरंडवणे, पुणे या शाळेत ग्रेस लेडीज ग्लोबल संघटना, सिंगापूर /यु. एस. ए . आणि रिता इंडिया फाऊंडेशन, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेस्टिव्ह इव्हेंट’ २०२२ चे आयोजन इयत्ता ८,९ आणि १० वि मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसाठी १७ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
या फेस्टिव्ह इव्हेंट ची थीम होती, ‘गर्ल’स एम्पॉव्हरमेंट’. या थीमवर आधारित मुलींमध्ये असलेल्या नॉन अकॅडमिक पॅशन म्हणजेच दिया डेकोरेशन, राखी मेकिंग, रांगोळी, मेहंदी , होम डेकॉर, ग्रीटिंग कार्ड, ड्रॉईंग आणि फॅशन शो या ८ कॅटेगरी चा समावेश होता. विद्यार्थिनीन मधील सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांना आणि शाळेला ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता . या मधील सहभागासाठी विद्यार्थिनीना ग्रेस लेडीज ग्लोबल संघटनेकडून प्रमाणपत्र देण्यात आले.
फॅशन शो मध्ये एकूण ८९ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. फॅशन शो ची थीम होती, ‘वॉक विथ कॉन्फिडन्स. ग्रेस लेडीज च्या फॅशन शो मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी होणारी ही पहिलीच शाळा. विद्यार्थिनींना याद्वारे स्टेज वरती येऊन स्वतःला आत्मविश्वासाने सादर करत आजच्या घडामोडी विषयी प्रश्न विचारण्यात आले. आणि यातूनच विनर्स ची निवड करण्यात आली. विद्यार्थीनीनी या सर्व कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि या सर्व विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्याचे काम सर्व विद्यार्थ्यांनी केले.
या कार्यक्रमाचे बक्षिसांचे प्रायोजकत्व सुहासिनी बिवलकर (सामाजिक कार्यकर्त्या ) आणि आचार्य डॉ. योगेशकुमार (अस्ट्रोयोग चे संस्थापक) यांनी केले. या मध्ये प्रत्येक कॅटेगरी मधील ३ विजेत्या मुलींना असे एकूण 26 बक्षिसे प्रायोजकत्व स्वीकारलेल्या पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी अस्ट्रोयोग च्या आधारस्तंभ सीमा कुचेरिया आणि कौन्सिलर रुपाली रणावरे – जाधव विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होत्या.
या मध्ये रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक ऐश्वर्या कांबळे, द्वितीय क्रमांक सपना अस्की आणि तृतीय क्रमांक सौभाग्या अग्सबल , मेहंदी स्पर्धेत प्रथम पद्मा शेखर, द्वितीय अंजली दोडमनी, तृतीय लक्ष्मी मडीमनी, होम डेकोरशन स्पर्धेत प्रथम लक्ष्मी बागायतदार, द्वितीय नागरत्ना तंदूर, तृतीय अश्विनी मेकेरी , दिया डेकोरशन स्पर्धेत अनुक्रमे ऐश्वर्या जेवर्गी, शीतल मल्लवगोल , अपसाना नदाफ , ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत अनुक्रमे मेघा तावरखेड, अंकिता शिंगे, भाग्यश्री चालावडी , राखी मेकिंग स्पर्धेत अनुक्रमे मीनाक्षी तलीकोटी, शीतंमा तालावार , रेणुका कोळी, चित्रकला आणि पेंटिंग स्पर्धेत अनुक्रमे अंकिता कांबळे, त्रिवेणी धनगर, कावेरी अंजिनेया आणि फॅशन शो स्पर्धेत अनुक्रमे भाग्यश्री तलकेरी, सौम्या अगसबल आणि रुक्मिणी रावजी यांनी पारितोषिक पटकावले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रिता शेटीया (रिता इंडीया फाउंडेशनच्या संस्थपिका आणि ग्रेस लेडीज ग्लोबल संघटनेच्या राजदूत) आणि एच. सी . डॉ. सविता शेटीया (ग्रेस लेडीज ग्लोबल संघटनेच्या क्लब मेंबर) यांनी केले.
शाळेचे प्रिन्सिपल श्री. चंद्रकांत हारकूडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शिक्षिका विल्मा मार्टीस , श्रेया हब्बू , उषा मोरे , शोभा पंचांगमठ, पूजा पुजारी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शिक्षकेत्तर बसप्पा जवारी आणि मनीषा परदेशी यांनी सभागृह व तांत्रिक व्यवस्था सांभाळली. काही विद्यार्थ्यांनी उत्साहाने फोटोशूट आणि व्हिडीओ काढण्यात मदत केली. कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक श्री. सदानंद तावरगेरी उपस्थित होते.
यावेळी दहावी मध्ये शिकणारी कृतिका पाटील म्हणाली , या मुळे आम्हाला आमच्या मधील कौशल्य जागतिक स्तरावर नेण्याची संधी मिळाली.
नववी मध्ये शिकणारी भाग्यश्री शिवांगी म्हणाली, आज च्या कार्यक्रमामुळे स्टेज डेअरिंग आले. स्वतः मधील कलेतून गर्ल्स एम्पॉवरमेंट वर काय दाखवतात येऊ शकते. नवीन कला आत्मसात करता आली.
आठवी मध्ये शिकणारी ऐश्वर्या जेवरगी म्हणाली, आज झालेल्या फॅशन शो मधून आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला , की आपण कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतो , फक्त करण्याची जिद्द हवी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विल्मा मार्टीस यांनी केले.