*कोंढवा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात…*
*महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्याचा माजी नगरसेवक गफुर पठाण यांचा इशारा*…*
पुणे ….. पुण्यातील कोंढवा परिसर पाण्याने आणि ड्रेनेज लाईन फुटल्याने दुर्गंधीयुक्त वातावरणाने अतिशय नागरिकांसाठी अतिशय धोकादायक आणि आरोग्यास हानिकारक झाला आहे .सतत चा पाऊस आणि प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .लवकरात लवकर महापालिकेने लक्ष द्यावे अन्यथा पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा माजी नगरसेवक गफुर भाई पठाण यांनी दिला आहे .कोंढवा खुर्द-मिठानगर हा दाट लोकवस्तीचा व अतिशय छोटे रस्ते असलेला प्रभाग मानला जातो.त्यातच पावसामुळे मागील आठ दिवसापासुन या प्रभागातील मिठानगर मुख्य रस्त्यावरील चेतना गार्डन सोसायटीसमोरील ड्रेनेजचे झाकण तुटुन संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.अशरशः रस्त्याला नदीसारखे दृष्य पाहायला मिळत आहे.यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन कुठलिही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थानिक नागरिकांमध्ये सदर बाबतीत खुप आक्रोश वाढत आहे.नगरसेवकांची मुदत संपल्याने सध्या पालिका प्रशासन आहे त्यामुळे पालिका प्रशासन,वार्ड ऑफिसर यांना वारंवार तक्रार करुन,पाठपुरावा करुनदेखील निधी उपलब्ध नसल्याचा कारण देत दुर्लक्ष होत आहे,त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात या समस्येवर कुठलिही ठोस उपाययोजना झाली नाही तर नागरिकांसमवेत पालिकेवर मोठ्या प्रमाणावर आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक मा.नगरसेवक गफुर पठाण यांनी दिला.