Friday, November 8, 2024

ऐन दिवाळीच्या काळात वर्षाला १५ सिलेंडरचा नियम करत जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन

 

ऐन दिवाळीच्या काळात वर्षाला १५ सिलेंडरचा नियम करत जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने महागाईमध्ये वाढ करत देशातील जनतेला लुटणाऱ्या मोदी सरकारने ४०० रुपयांचा सिलेंडर ११०० रुपये केला आणि तो सिलेंडर आणखी महाग करण्यासाठी आता एका कुटुंबाला वर्षाला केवळ १५ सिलेंडर मिळतील असा किचकट नियम आणला आहे. या नियमामुळे सर्वसामान्य जनतेला आणखी सिलेंडरच्या दरवाढीचा झटका बसणार असून लोकांनी सिलेंडर वापरूच नये यासाठी केंद्रातील मोदी सरकार हे सर्व प्रयत्न करत आहेत.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “सर्वसामान्य नागरिकांच्या दररोजच्या स्वयंपाक घरातील अत्यावश्यक वस्तूंवर जी.एस.टी लावण्याचा नियम इंग्रजांनंतर कोणी लावला तर तो मोदी सरकारने लावला. सिलेंडरच्या किमतींमध्ये दरवर्षी साधारणतः २० ते २५ टक्क्यांची वाढ मोदी सरकारमुळेच होते. आता पंधरा सिलेंडरचा नियम लावल्यानंतर जो काही पुढच्या सिलेंडरच्या बाबतीत काळाबाजार होईल त्याला कोण जबाबदार…? सर्वसामान्य माणसांना सिलेंडरला मिळणारी सबसिडी बंद झाली त्याला कोण जबाबदार….? एकीकडे बेरोजगारी वाढल्याने नोकऱ्या नाहीत. कोविडच्या महामारीच्या काळात आहे त्या नोकऱ्या गेल्या, सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती नोकरीला असताना ती संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करत असे आता एवढी महागाई झाली की, कुटुंबात २ ते ३ व्यक्ती नोकरीला असल्याशिवाय कुटुंब चालू शकत नाही.जर महागाईचा दर वाढवायचा असेल तर त्याप्रमाणात नोकऱ्या देखील उपलब्ध झाल्या पाहिजे.परंतु तसे न होता केवळ आपल्या जवळच्या मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी महागाई वाढवली जात आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसे …..? असा प्रश्न या मोदी सरकारच्या महागाईच्या धोरणांमुळे निर्माण होत आहे”.

मोदी सरकारच्या याच धोरणांचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महिला भगिनींनी चुल मांडत त्यावर दिवाळीचा फराळ तयार केला. ऐन दसरा – दिवाळी या सणासुदीच्या काळात हा नियम करत गरिबांचा गॅस पळविला असल्याने या वर्षी चुल्हीवर फराळ करण्याची वेळ आली आहे.केंद्र सरकारने त्वरित ही वाढलेली महागाई कमी करावी व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते प्रदीप देशमुख , मृणालिनी वाणी, शिल्पा भोसले , मनिषा होले किशोर कांबळे, मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, उदय महाले, रोहन पायगुडे, संतोष हत्ते, गोरक्षनाथ भिकुले , दिलशाद अत्तार , सुरेखा धमिष्ठे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles