Marathi news

*आसवानी क्रिकेट कप स्पर्धेचे दुसरे पर्व २९ एप्रिलपासून*

*आसवानी क्रिकेट कप स्पर्धेचे दुसरे पर्व २९ एप्रिलपासून*

श्रीचंद आसवानी यांची पत्रकार परिषदेत माहिती; खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून शुभेच्छा

पुणे : ‘आसवानी क्रिकेट कप’ क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व २९ एप्रिल २०२३ पासून सुरु होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही क्रिकेट स्पर्धा २२ दिवस चालणार आहे. या स्पर्धेत एकूण १४ संघ खेळणार असून, टी-१० स्वरूपात हे सामने होणार आहेत. ‘ये है पिंपरी का त्योहार’ ही टॅगलाईन घेऊन हा क्रीडा महोत्सव होत आहे, अशी माहिती स्पर्धेचे प्रमुख संयोजक आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक श्रीचंद आसवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आसवानी क्रिकेट कप स्पर्धेचा लिलाव नुकताच मृणाल क्रिकेट ग्राउंडवर झाला. त्यानंतर आसवानी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी १४ संघांचे संघमालक उपस्थित होते. मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी लिलावाला उपस्थित राहून सर्व संयोजक व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

श्रीचंद आसवानी म्हणाले, “सिंधी समाजातील तरुणांमध्ये खेळ आणि तंदुरुस्तीबाबत गोडी निर्माण करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. सिंधी समाजाला व्यवसायाबरोबरच खेळातही प्रगती करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरते. पहिल्या पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आमची ऊर्जा वाढली आहे. एकूण ३०४ खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. त्यातून १५४ खेळाडूंची निवड करण्यात आली. पुणे व पिंपरी-चिंचवडसह ठाणे, कल्याण, बारामती, सातारा शहरातून, तसेच कर्नाटक, गुजरात येथून खेळाडू सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेमुळे सिंधी समाजातील खेळाडूंना नव्या-जुन्या मित्रांसोबत खेळता येणार आहे.”

या १४ संघांचा समावेश
या स्पर्धेत पिंपरी इंडियन्स (विशाल तेजवानी-विशाल प्रॉपर्टीज), रत्नानी नाईट रायडर्स (प्रकाश रत्नानी-रोझ ग्रुप), मंगतानी टायटन्स (बग्गी मंगतानी-कोमल असोसिएट्स), तिल्वानी चार्जर्स (मयूर तिलवानी-गीता बिल्डर्स), फ्रेंड्स वॉरियर्स (फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप), रॉयल चॅलेंजर्स वरुण (वरुण वर्यानी-एसएसडी एक्स्पोर्ट्स), केसवानी किंग्ज इलेव्हन (दीपक केसवानी-हॉटेल राधाकृष्ण), वाधवानी सनरायझर्स (पवन वाधवानी-साई वैष्णवी असोसिएट्स), मोटवानी रॉयल्स (हिरो मोटवानी-रोहित इन्फ्रा), आसवानी डेअरडेविल्स (श्रीचंद आसवानी-आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स), संत कंवरम लायन्स (लडकानी & लखवानी फॅमिली-विजयराज असोसिएट्स अँड लखवानी असोसिएट्स), देव टस्कर्स (शेरा अहुजा-सतनाम ड्रायफ्रुट्स), डायमंड सुपरकिंग्ज (मनजीत सिंग वालेचा-एमएसव्ही स्टील अँड अल्युमिनियम) आणि रामचंदानी सुपरजायंट्स (विजय रामचंदानी-एव्हीआर स्पेसेस) या १४ संघांचा स्पर्धेत समावेश आहे.

बक्षिसांची बरसात
“या स्पर्धेचे उद्घाटन २९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मृणाल क्रिकेट ग्राउंड, पिंपरी येथे होणार आहे. सर्व सामने युट्युब व फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपित केले जाणार असून, सर्व कुटुंबीय या स्पर्धेत प्रेक्षक म्हणून सहभागी होतील. विजेत्या संघाला ५,५५,५५५/-, तर उपविजेत्या संघाला ३,३३,३३३/- रुपयांचे रोख पारितोषिक व करंडक दिला जाणार आहे. यासह मॅन ऑफ द सिरीजसाठी चेतक स्मार्ट इलेक्ट्रिक स्कुटर, हॅट्रिक विकेटसाठी १,०१,०००/-, हॅट्रिक सिक्सेससाठी ५१,०००/-, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी १०,०००/-, प्रत्येक सिक्ससाठी १०००/-, प्रत्येक चौकारासाठी ५००/- रुपये बक्षीस दिले जाणार आहे.”

यांनी लावला स्पर्धेला हातभार
या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स आहेत. असोसिएट स्पॉन्सर आर्को रियल्टी (रवी ओचानी), मीडिया स्पॉन्सर पीसीएमसी केबल्स (अरुण शर्मा), एफएनबी पार्टनर रंगला पंजाब (रमण बिंद्रा), टॉस स्पॉन्सर सिटी कार्स (रॉकी सेवानी), जर्सी स्पॉन्सर शगुन टेक्स्टाईल्स (सुमित बोदानी), स्ट्रॅटेजिक पार्टनर गोगिया ग्रुप (सनी गोगिया) व फेअर प्ले अवॉर्ड स्पॉन्सर ओम कंस्ट्रक्शन्स (पंकज केसवानी) आहेत. संयोजन समितीमध्ये विजय आसवानी, सोमेश गिडवाणी, हितेश बाटवा, अविनाश इसरणी, शाईल कुकरेजा, राहुल तेजवानी, सुनीत सोनवाणी, जॅकी दासानी, दिनेश मुलचंदानी, ऋषी उबरानी , नीरज कृपलानी, पंकज मंगतानी, विकी चंचलानी यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button