*आरोग्य कर्मचाऱ्यांना मिठाई, कपडे व अर्थसहाय्य वाटप*
*पुणे शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे – रमेश बागवे*
दिवाळी आणि भाऊबीज सणाचे औचित्य साधून किरण लोंढे आणि मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना मिठाई, कपडे, अर्थसहाय्य व तुळशीच्या वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रमेशदादा बागवे, अविनाश बागवे, यासीर बागवे, किशोरी शिंदे, विठ्ठल थोरात, राजू दुल्लम, धनंजय नवले, विजयकुमार वाघमोडे, रेश्मा किरण लोंढे, लीना लोंढे, स्वामींनी लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
रमेश बागवे म्हणाले की पुणे शहरात सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. रस्ते, गटारे, उद्याने, फुटपाथ अशा अनेक ठिकाणी हे कर्मचारी काम करत असतात. म्हणून ह्या सफाई कर्मचाऱ्यांची सहा महिन्यातून एकदा आरोग्याची तपासणी पुणे महानगरपालिके तर्फे मोफ़त करण्यात यावी. किरण लोंढे यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
अविनाश बागवे म्हणाले की आपल्या कुटुंबा सोबत आपण आनंद साजरा करत असताना आपल्या समाजात सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी आपण सर्वांनी माणुसकीने पाहिले पाहिजे. आरोग्य कर्मचारी यांच्यामुळे आपला परिसर स्वच्छ, रोगराई मुक्त राहण्यास मदत होते.
किरण लोंढे म्हणाले की सामाजिक जाणीवेतून आम्ही दिवाळी आणि भाऊबीज या सणाची भेट म्हणून १०० हुन अधिक सफाई कामगारांना कपडे, मिठाई, तुळशीचे रोप व अर्थसहाय्याचे वाटप केले. सिंहाचा वाटा नसला तरी खारीचा वाटा आम्ही उचलला आहे.
दत्ता लोंढे, दिगंबर इंगळे, लक्ष्मण लोंढे, रोहित लोंढे, अभिजित पवार, रणजित मोहिते, हुसेन शेख, सुरेखा खंडाळे, अरुण गायकवाड मारुती कसबे आदींनी कार्यक्रमासाठी श्रमदान केले. या ठिकणी अनेक मान्यवरांनी मनोगते सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साठे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुजित रणदिवे यांनी केले आणि आभार किरणभाऊ लोंढे यांनी मानले.